आई-बाबा
आईच्या मायेची आठवण,
बाबांचा चेहरा हसरा सोज्वळ.
त्यांच्यामुळेच आहे आयुष्यात,
आनंदाची उधळण.||१||
जग कितीही मोठं दिसतं,
आईशिवाय घर रिकामं भासत.
बाबांशिवाय जीवन अपूर्ण वाटत,
आठवणी होता मनी दाटुन येतं.||२||
आईच्या हाताचा स्पर्श खास,
बाबांच्या शब्दांत जीवनाचा ध्यास.
तुमच्यामुळेच सुंदर आहे प्रवास,
क्षणोक्षणी तुमची वाटते आस.||३||
आईच्या डोळ्यात काळजी,
बाबांच्या खांद्यावर जबाबदारी.
प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची,
नेहमीच घेतात खबरदारी.||४||
आईच्या कुशीत आहे स्वर्ग,
बाबांचा आधार म्हणजे मार्ग.
तुमच्या पाठिंब्याने मिळते धैर्य,
आशीर्वादाने सुकर होते कार्य.||४||
आई-बाबा माझे देवता,
चरणी नतमस्तक माथा.
लाभो निरोगी आनंदी दीर्घायुष्य,
हीच प्रार्थना निरंतर हृदयात.||५||
*काव्यरचना -सौ.कल्याणी मोरे.*
नवी मुंबई (सी.बी.डी.)
