आजची नारी लय लय भारी
आजची ही नारी ..लय लय भारी
जशी बेरकी.. दमदार उभी...
अहो दाजीबा... मुजोर दिसतयं सारं...
हे वागणं बरं नव्हं...।।धृ।।
डौल दाविते पैशाचा..आयटी मधल्या नोकरीचा
घरची कामं नको हिला.. आराम बाई हवा हिला
आरं आरं देवा.. कसा हो शिकवू धडा..
हे वागणं बरं नव्हं..१
ज्येष्ठांचा हो नाही मान.. काळजी नाही खाणं पिणं
नातंलगही नको हिला... नवरा फक्तच हवा हिला...
आरं आरं देवा... लाजच सोडली हीन...
हे वागणं बरं नव्हं..२
कपडा लत्ता भारी भारी... तोकडे कपडे अंगावरी
चैन जिवाची अति करी... माणसांची ना कदर उरी..
आरं आरं देवा.... स्वैरपणे बावरली...
हे वागणं बरं नव्हं..३
लेक लाडाची आईची.. बेशिस्तपणे हो वागायची
आरंला का रं म्हणायची.. भांडण तमाशा करायची..
आरं आरं देवा... शिकवण हिला माहेराची...
हे वागणं बरं नव्हं...४
हॉटेलचं जेवणं आवडे हिला.. स्वयंपाक बाई नको हिला
डॉग डॉगीत ही रमायची.. नसता छंद लावायची...
आरं आरं देवा... कुणी पिळावे कान ?
हे वागणं बरं नव्हं...५
कलियुग हे बाई बाई... परिणामी हो अनर्थ होई..
वेळ काळ ना येई परत... पश्चातापाची होळी करत...
आरं आरं देवा.... तूच दाव वाट हिला..
हे वागणं बरं नव्हं...६
आजची ही नारी..लय लय भारी
जशी बेरकी... दमदार उभी...
अहो दाजीबा.. मुजोर दिसतंय सारं
हे वागणं बरं नव्हं..
डॉ.सौ. राजश्री संजय जाधव
सोलापूर
९४२०४८८७३३
