माझे बाबा
बाबा माझे जीवन आधार
छायेत त्यांच्या सुखाचे घर
संकटे आली जरी अपार
देतात नेहमी संकटात धीर...
पाठीशी उभे असतात खंबीर
देत नाहीत क्षणभर अंतर
सोबतीस असतात हजर
हृदयात त्यांच्या प्रेम निरंतर ...
लाड पुरवतात आजवर
मागितले ठेवतात हातावर
पाठीवर त्यांचा विश्वासाचा कर
जीवनात पडते यशाची भर...
त्यांचा त्याग अनोखा फार
मानत नाहीत कधी हार
मार्गदर्शक त्यांचे विचार
शिकवतात जीवनाचे सारं...
मनात मायेचा शांत सागर
उन्हातही जणू सावली गार
त्यांच्या आशीर्वादाने जीवनसुंदर
त्यांच्यामुळेच जीवनास आकार..
काव्यरचना - अनिता वारडे
