Home

रायगड जिल्हा पोलिस अंतर्गत सागरी सुरक्षा चषक 2025 रेवदंडा येथे कब्बडी साखळी स्पर्धेचा भव्य शुभारंभ


 रायगड जिल्हा पोलिस अंतर्गत सागरी सुरक्षा चषक 2025 रेवदंडा येथे  कब्बडी साखळी स्पर्धेचा भव्य शुभारंभ 

अलिबाग -  अमुलकुमार जैन 


मच्छीमार बांधव, सागर सुरक्षा दल व पोलिस यांच्या मध्ये समन्वय वृध्दीगत करण्यासाठी रायगड जिल्हा पोलिस अंतर्गत सागरी सुरक्षा चषक 2025 च्या साखळी कब्बडी स्पर्धेचा भव्य शुभारंभ कार्यक्रम रेवदंडा बीच येथे संपन्न झाला. 

सागरी सुरक्षा व मच्छीमार बांधव यांचेसाठी आयोजीत दि. 13 सप्टेबर 2025  ते 17 सप्टेबर 2025 कालावधीत रायगड जिल्हा पोलिस अंतर्गत सागरी सुरक्षा चषक 2025 च्या साखळी कब्बडी स्पर्धा मांडवा, अलिबाग, रेवदंडा, मुरूड व श्रीवर्धन या समुद्र किनारी आयोजन  केले आहे. त्या स्पर्धेती साखळी कब्बडी स्पर्धेचा भव्य शुभारंभ 13 सप्टेबर 2025 रोजी सकाळी दहा वाजता रेवदंडा बीच येथे संपन्न  झाला या सपर्धेचे मुख्यःनिमंत्रक रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक ऑचल दलाल असून सुरक्षा शाखा सपोनि रविंद्र पारखे, सपोनि श्रीकांत किरविले,व अप्पर पोलिस अधिक्षक अभिजीत शिवथरे हे विशेष्ा निमंत्रीक आहेत. 

रेवदंडा बीच येथे अप्पर पोलिस अधिक्षक अभिजीत शिवथरे यांचे शुभहस्ते श्रीफळ वाढवून साखळी कब्बडी स्पर्धेचा भव्य शुभारंभ झाला, प्रसंगी रेवदंडा पोलिस ठाणे इन्चार्ज सपोनि श्रीकांत किरविले, रेवदंडा प्राथमिक आरोग्य केेंद्राचे डॉक्टर आशिष धरणकर, सरपंच प्रफुल्ल मोरे, ग्रा.प.सदस्य सुराराम माळी, शिवसेना महिला रेवदंडा अध्यक्ष शलाका राउत, रेवदंडा सागरी सुरक्षा प्रमुख सुहास घोणे, खादय सम्राट नलिनी मुंबईकर, तसेच रेवदंडा पोलिस ठाणे कर्मचारीवर्ग व रेवदंडा सागरी सुरक्षा दल सदस्य यांची उपस्थिती होती. तसेच उध्दव ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे व रेवदंडा ग्रा.प.सदस्य संतोष मोरे यांनी स्पर्धे दरम्यान भेट दिली. या स्पर्धेत रेवदंडा,नागोठणे, अलिबाग व पोयनाड या कब्बडी संघाचे साखलीतील सामने पार पडले. 

या स्पर्धेत पंच म्हणून सहा.फौजदार मुख्यालय नितीन समजीसकर, सहा.फौजदार नितिन समजिसकर, सहा.फौजदार नंदकुमार पाटील,पोह विश्वनाथ म्हात्रे, सहा. फौजदार संजय मोकल, पोह अमोल नलावडे, पोह स्वागत ठाकूर, पोना प्रणित पाटील, पोशि सुरज म्हात्रे,पोशि सर्वेश थळे, पोशि. ज्ञानेश्वर पालवे यांनी काम पाहिले. तसेच रायगड जिल्हा स्पोर्टस्‌‍ इन्चार्ज ॠषीकेश साखरकर, सपोनि रविंद्र पारखे, मारूती पाटील, चंद्रकांत बोरकर यांचे विशेष सहकार्य लाभले. स्पर्धेचे व कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विश्वनाथ पाटील यांनी केले. 

रेवदंडा पोलिस ठाणे इन्चार्ज सपोनि श्रीकांत किरविले यांनी अप्पर पोलिस अधिक्षक अभिजीत शिवथरे यांचे स्वागत शल,श्रीफळ व पुष्पगूच्छ प्रदान करून केले. यावेळी रेवदंडा पोलिसांचे वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र रेवदंडा डॉ. आशिष धरणकर,सरपंच प्रफुल्ल मोरे, खादय सम्राट नलिनी मुंबईकर, सुराराम माळी, शलाका राउत,शिवसेना उध्दव ठाकरे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे,  आदीचे स्वागत पुष्पगूच्छ प्रदान करून करण्यात आले. 

या स्पर्धेसाठी एचसी महेंद्र राठोड, एचसी मनीष ठाकूर, पिएन सुग्रीस गव्हाणे, व पिएन सिध्देश शिंदे यांच्यासह रेवदंडा पोलिस ठाणे कर्मचारीवर्ग व रेवदंडा सागरी सुरक्षा दल सदस्य, पोलिस पाटील स्वप्निल तांबडकर, ग्रामपंचायत कर्मचारी सचिन मयेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post Next Post