थळ येथे स्विमिंग पूल मध्ये शॉक लागून तरुणाचा मृत्यू
अलिबाग - अमुलकुमार जैन
अलिबाग तालुक्यातील थळ येथील बीच वॉक या रिसॉर्ट मधील स्विमिंग पूल मध्ये शॉक लागून श्रीनिवास म्हात्रे (वय ४२वर्षे, राहणार किहीम, तालुका अलिबाग, रायगड) यांचा मृत्यू झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील किहीम येथील श्रीनिवास म्हात्रे हे दहा दिवसाच्या श्री गणरायाचे विसर्जन झाल्यानंतर
रविवारी दिनांक दिनांक ७ सप्टेंबर २०२५रोजी नातेवाईक यांच्यासह कर केल्यानंतर थळ येथील बीच वॉक रिसॉर्ट मध्ये मौजमजा करण्यासाठी गेले होते. सद्यःस्थितीत बीच वॉक रिसॉर्ट हे विनोद गुप्ता नामक व्यक्ती ने भाड्याने घेतले आहे.श्रीनिवास म्हात्रे यांना विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्याचे समजताच त्यांना तातडीने अधिक जलदगतीने औषधं उपचार मिळावे यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथील कार्यरत वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक भुंडेरे करीत आहेत.
