Home

"वाढदिवसाचे निमित्त साधून एक अनोखा उपक्रम":भालचंद्र खरळकर


 "वाढदिवसाचे निमित्त साधून एक अनोखा उपक्रम"

       =======================

"बाप-ल्योक वाढदिवसा" निमित्त राबवलेल्या "उंची इतकी पुस्तकं वाटप" आणि त्यातून साकारलेल्या वाचन चळवळीच्या दोन संकल्पना अत्यंत प्रेरणादायी आणि समाजहिताच्या आहेत.चिलवट पिता-पुत्राचा हा उपक्रम वाचून मनापासून आनंद आणि अभिमान वाटतो.

"वाढदिवसाचा उद्देश बदलणारा उपक्रम"...आपण वाढदिवस फटाके,केक किंवा फक्त आनंदसाजरा करण्याऐवजी समाजासाठी काही सकारात्मक देणं देण्याचं ठरवलंत हीच खरी मूल्यसंस्कारांची शिकवण आहे.

आजच्या काळात बाप-ल्योक (वडील आणि मुलगा) मिळून अशा उपक्रमाची सुरुवात करणे म्हणजे संस्कारांची परंपरा नव्या पिढीत रुजवण्याचा एक आदर्श मार्ग आहे.

 "ग्रंथतुला ते पुस्तकं वाटप"....आजवर आपण ग्रंथतुला पाहिली पण ती केवळ एखाद्या व्यक्तीचा गौरव करण्यापुरती मर्यादित असते.परंतु तुम्ही तीच प्रेरणा घेऊन "उंची इतकी पुस्तक वाटप" केल्यामुळे ज्ञानाचा खजिना समाजात मुक्तपणे वितरित होत आहे.

 "संकल्पना १....मोबॉईल व्यसनमुक्ती - पुस्तकांशी दोस्ती"....आजची तरुण पिढी मोबाईलच्या आहारी गेलेली आहे.त्यातून त्यांचं लक्ष विचलित होतंय, मनाची एकाग्रता कमी होतेय आणि शारीरिक-मानसिक हानीही होतेय.आपण मोबाईल सोडून पुस्तकांशी मैत्री करण्याचा संदेश देत आहात,हाच आजच्या काळातला सर्वात सुंदर विचार आहे.

"संकल्पना २....बाजार दिन - एक पिशवी भाजीपाल्यासाठी, एक पिशवी पुस्तकांसाठी"....बाजारात जेव्हा लोक भाजी घेण्यासाठी जातात,तिथेच वाचनाची आठवण करून देणं हे अतिशय क्रांतिकारी विचार आहे.ही संकल्पना म्हणजे "शिकण्याचं बीज रोजच्या जीवनात रोवण्याचा प्रयत्न" आहे.ग्रामीण भागातसुद्धा वाचनसंस्कृती वाढवण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे.

"वाचन हीच खरी मानसिक शक्ती आहे."...आपण समाजात वाचनसंस्कृती वृद्धिंगत करायचा जो संकल्प केला आहे,तो पुढच्या पिढ्यांना चांगले विचार,निर्णयक्षमता आणि सजग नागरिकत्व देतो.आपल्या उपक्रमातून एक सकारात्मक चळवळ निर्माण होईल,जी माणूस म्हणून जपणाऱ्या मूल्यांचा प्रचार करेल.

"वाचाल तर वाचाल"....वाचनामुळे व्यक्ती हा सर्वगुणसंपन्न होतो व त्याच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते.वाचनामुळे खूप गोष्टी साध्य करता येतात.म्हणूनच तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात वाचाल तर वाचाल.

शेवटी एकच सांगावेसे वाटते... "त्यांच्या उंची एव्हढी पुस्तकं वाटणे म्हणजे समाजालाच ज्ञानाच्या उंचीवर घेऊन जाण्यासारखे आहे."बाप आणि लेकराच्या नात्यातून उगम पावलेली ही वाचन चळवळ,वाचन संस्कृती भविष्यात एक नवी क्रांती घडवू शकते.

15 ऑगस्ट 2025 या स्वातंत्र्यदिनादिवशी संतश्रेष्ठ सावता माळी मंदिर (चिखली-जाधववाडी)पुणे येथे पार पडलेल्या महाकवी संमेलनात देखील त्यांनी महाराष्ट्रातून आलेल्या कवी/कवयित्री यांना पुस्तके भेट देण्याचा सुंदर उपक्रम केला होता.

            त्यांच्या या उपक्रमाला आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून सलाम.तसेच आदरणीय श्री.नितीन चिलवंत सर आणि त्यांचे लेकरू शौर्यला वाढदिवसाच्या निमित्ताने साहित्य क्षेत्रातील ज्ञानरुपी पुस्तकांच्या उंचीएव्हढ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

अशी हि सुंदर कल्पना प्रत्यक्षात उतरविणारे पितापुत्र आहेत मराठवाड्यातील सावंगी या गावचे.सध्या ते पुणे येथे रहात आहेत.

"बाप -श्री.नितीन श्यामसुंदर चिलवंत"

"ल्योक-चि.शौर्य नितीन चिलवंत"

सावंगी (मगर ) ता. मानवत ,जि. परभणी मराठवाडा ,महाराष्ट्र राज्य.

संपर्क : ८७९३६२६७८१/९३२६०४३४६४

भालचंद्र खरळकर.

Previous Post Next Post