Home

महसूल विभागाने जप्त केलेला ट्रक चोरून नेणाऱ्या मालकाला देवरूख पोलीसांनी ठोकल्या बेड्या




महसूल विभागाने जप्त केलेला ट्रक चोरून नेणाऱ्या मालकाला देवरूख पोलीसांनी ठोकल्या बेड्या


देवरूख(वार्ताहर) 


संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथे महसूल विभागाने कारवाई करून जप्त केलेला तब्बल १९ लाख रुपयांचा ट्रक चोरून नेल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. ट्रक चोरून नेणाऱ्या ट्रकमालकाला देवरूख पोलीसांनी साखरपा येथून अटक केली आहे. शरणबसप्पा धरमण्णा तळवार (रा. कलंहागरगा, जि. गुलबर्गा, कर्नाटक) असे या आरोपीचे नाव आहे. दरम्यान, मोबाईल लोकेशनद्वारे या आरोपीचा शोध घेवून देवरूख पोलीसांनी मुद्देमालासहित या आरोपीला ताब्यात घेतले आहे. देवरूख पोलीसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे कौतुक होत आहे. ही कामगिरी देवरूख पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पो. हे. काँ. आर्या वेलवणकर, पो. हे. काँ. सचिन कामेरकर, पो. हे. काॅ. सचिन पवार, पो. हे. काॅ. अभिषेक वेलवणकर, चालक पो. काॅ. पाटील यांनी केली आहे. 


Previous Post Next Post