डोलवी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू
रायगड - अमुलकुमार जैन
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम चौदा वर्षा होऊन पूर्ण झाला नाही.मात्र हा राष्ट्रीय महामार्ग हा दिवसेंदिवस हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या महामार्गावर चारशे हून अधिक निष्पाप नागरिकांचा बळी घेतला असून साडे आठशे हून अधिक निष्पाप नागरिक जायबंदी झाले आहेत. तरी रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशी आस्था कोकणातील मंत्री, खासदार, आमदार तसेच वरिष्ठ अधिकारी यांना दिसत नाही आहे. असे असतानाच रायगड जिल्ह्यातील वडखळ पोलिस हद्दीत एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ४६वर्षीय महिलैचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना समोर आली आहे. मृत पावलेल्या महिलेचे नाव नलिनी प्रविण म्हात्रे(वय ४७वर्षे, रा सागर सोसायटी, घर नं ३८५, चिंचपाडा, मोतीराम तलावाजवळ, ता. पेण, जि.रायगड) असे आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या वडखळ पोलिस स्टेशन हद्दीत असणाऱ्या डोलवी गावाजवळ असणाऱ्या पुलावर सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास मयत नलिनी प्रविण म्हात्रे(वय ४७वर्षे, रा सागर सोसायटी, घर नं ३८५, चिंचपाडा, मोतीराम तलावाजवळ, ता. पेण, जि.रायगड) ह्या त्यांच्या ताब्यात असलेल्या टी व्हि एस कंपनीची ज्युपिटर गाडी क्रमांक एम.एच.०६ बी.टी.१८५२ घेऊन रोहा तालुक्यातील कोलाड सुतार वाडी येथे मुलगा वल्लभ यांचे कॉलेजमध्ये पालकाची मिटींग असल्याने जात असताना
मौजे डोलवी गावाजवळील पुलाजवळ सकाळी सुमारे ७:३० वाजता अज्ञात वाहनाने त्यांना ठोकर मारली. या अपघातानंतर वाहन येथून निघून गेले. या अपघातात मयत
नलिनी प्रविण म्हात्रे या गाडीवरून खाली पडल्या. त्यावेळी त्यांच्या डोक्यावर असणारे हेल्मेट फुटून अज्ञात वाहन हे डोक्यावरून वाहन गेल्याने डोक्याला गंभीर दुखापत (डोके फुटुन) जागीच त्यांचा मृत्यू झाला आहे.
या अपघाताची नोंद वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा.रजि.नं ९७/२०२५ भा न्या संहिता २०२३ चे कलम १०६(१), १२५(अ), १२५ (ब), २८१ मो वा का क १८४, १३४ प्रमाणेदाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास महिला पोलिस उप निरीक्षक योगिता सांगळे करीत आहेत.अशा प्रकारच्या अपघातांबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन पोलीस नागरिकांना करत आहेत.
सदर अपघात झाला त्या ठिकाणी जे एस डब्ल्यू कंपनीचे सी सी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे या कॅमेरा मध्ये अपघाताचे दृश्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र पोलिस हे जाणीवपूर्वक या कॅमेरे मध्ये कैद झालेले दृश्य घेत नसतील आणि अज्ञात वाहन याला वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप डोलवी परिसरातील नागरिकांनी केला आहे.