Home

मुंबई विद्यापीठाच्या ५८ व्या युवा महोत्सवामध्ये देवरूखमधील डी-कॅड कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश



मुंबई विद्यापीठाच्या ५८ व्या युवा महोत्सवामध्ये देवरूखमधील डी-कॅड कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

देवरूख(वार्ताहर)

 मुंबई विद्यापीठाच्या ५८ व्या युवा महोत्सवाच्या रत्नागिरी येथे झालेल्या प्रथम फेरीत संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथील कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन कला महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांनी चार कलाप्रकारांमध्ये पारितोषिके प्राप्त करून मुंबई विद्यापीठात होणाऱ्या अंतिम फेरीसाठी आपली जागा निश्चित केली होती. 

दि. 22 ते 24 सप्टेंबर दरम्यान मुंबई विद्यापीठ येथे झालेल्या अंतिम फेरीत फाइन आर्ट या विभागातून कला महाविद्यालयाला तीन प्रकारात यश मिळाले आहे. 

ऑन द स्पॉट पेंटिंग - मृणाल पंडित

कार्टूनिंग - देवाशिष पवार

रांगोळी - अमर राऊळ

यांनी पारितोषिके प्राप्त केली आहेत. या विद्यार्थ्यांना प्राध्यापक अवधूत पोटफोडे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष अजय  पित्रे, भारती पित्रे, प्राचार्य मराठे व सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.


Previous Post Next Post