रायगड जिल्हयामध्ये सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार
अलिबाग - अमुलकुमार जैन
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, यांचेकडील दिनांक 01 सप्टेंबर 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या निर्देशाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक 02 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये रायगड जिल्हयामध्ये सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे.
पाणंद रस्ते विषयक मोहिम अंतर्गत पाणंद शिवार रस्त्यांना क्रमांक देण्याचायतच्या महसूल विभागाकडील शासन निर्णय 29.08.2025 ची अंमलबजावणी करणे. शिव/पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करणे, ज्या पाणंद रस्त्यांची नोंद निस्तार पत्रक वाजिब उल अर्जामध्ये करण्यात आलेलो नाही त्याची नोंद घेण्याचाचत कार्यवाही करणे, शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी संमतीपत्र घेणे. रस्ता अदालत आयोजित करून शेतरस्त्यांचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, शेतरस्त्यांची मोजणों व सीमांकन ची कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्ह्यामध्ये तालुकानिहाय संबंधित उप अधिक्षक, मंडळ अधिकारी, ग्राम मसहूल अधिकारी यांची बैठक घेवून अभियानाची सविस्तर माहिती देणेत आली आहे. तसेच संबंधितांना गांवी शिवार फेरी आयोजित करुन, शिव/पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करणे, गांव नकाशाप्रमाणे सर्व नमूद रस्त्यांची पहाणी करुन, रस्त्यांची सद्यस्थिती तपासणे, लांबी रुंदी मोजणे व छायाचित्र काढणे तसेच अतिक्रमीत रस्त्यांची यादी तयार करणेची कार्यवाही सुरु करणेत आली आहे. तसेच गांव नकाशावर नोंद असलेले व नोंद नसलेले रस्ते यांचे वर्गीकरण करणेबाबत सूचित केले आहे.
सदर यादी उप अधीक्षक भुमी अभिलेख यांचेकडे देवून व सदर यादीतील पाणंद/शिवरस्ते मॅपिंग (चिन्हाकोत) करणेबाबत कार्यवाही करणेबाबत सुचना देणेत आल्या आहेत. तसेच सदर यादी व्यतिरिक्त असलेल्या रस्त्यांचे उप अधोक्षक भूमी यांना सर्वेक्षण करणेचे सुचना देण्यात आलेल्या नकाशांचे आधारे जागेवरील रस्त्यांचे सिमा अक्षांक्ष व रेखांशासह निश्चिती करणे.
गाव नकाशावर नसलेले व अतिक्रमित रस्त्यांबाबतची यादी निश्चित करुन, ग्रामसभेमध्ये ठरावाकरिता ठेवणेकरिता ग्रामसभा आयोजित करणेबाबत कार्यवाही करणेत येत आहे.अतिक्रमित रस्ते निष्कासित करणेचे अनुषंगाने मामलेदार न्यायालय अधिनियम, 1906 चे कलम 5 अन्वये सुनावणी आयोजित करणेत येईल. सुनावणी अंती अतिक्रमणे निष्कासित केलेनंतर सदरच्या रत्याची नोंद सार्वजनिक रस्ता म्हणून नोंद घेणेबाबत व रस्त्यांना विशिष्ट सांकेतांक निश्चित करण्याची कार्यवाही करणेत येईल.
याकरिता आढावा घेणे व उद्भवणारे प्रश्न सोडविणेयाकरिता शासन निर्णय दिनांक 29.08.2025 नुसार जिल्हास्तरीय समिती व प्रत्येक तालुकानिहाय समिती गठित करणेत आलेली आहे.
दुसरा टप्पा "सर्वासाठी घरे" या उपक्रमासाठी पूरक उपक्रम अंतर्गत सर्वासाठी घरे या उपक्रमांतर्गत ग्रामीण नागरी भागातील शासकीय जमिनीवरोल तसेच राज्य शासनाच्या उर्वरित स्वं विभागांच्या (वन विभाग वगळून) शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करणेकामी दिनांक 16/02/2018, दिनांक 17/11/2018 व दिनांक 06/03/2019 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयातील तरतुदीची अंमलबजावणी करणे पात्र लाभार्थ्यांना पट्टे वाटप मोहिम कारवाई करण्यात येणार आहे.
गायरान जमिनी, सार्वजनिक वापरातील जमिनी व वन क्षेत्र वगळून इतर शासकीय जमिनीवरील दिनांक 01/01/2011 पर्यतची निवासी प्रयोजनार्थ झालेल्या अतिक्रमणांची वादो निश्चित करुन, अतिक्रणधारक यांचेकडून आवश्यक त्या पुराव्यांसह अर्ज प्राप्त करुन घेणे,
प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने भूमि अभिलेख विभागाकडून, सदर अतिक्रमित जमिनीची मोजणी करणे व सदर जमिनीचा अभिन्यास प्राप्त करुन घेणे.पुनविकास/बांधकाम परवानगी देण्यापूर्वी संबंधित नागरी स्थानिक संस्थेने अतिक्रमित क्षेत्रावर अनुज्ञेय असलेल्या चटईक्षेत्र निर्देशांकाच्या मर्यादेत बांधकाम आराखडा मंजूर करणे,
पात्र अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबतचा प्रस्ताव शक्ती प्रदत्त समितीकडे मंजूरी साठी पाठविणे.अतिक्रमणधारकास अतिक्रमण नियमानुकूल झाल्याबाबतची सनद प्रदान करणे.
तिसरा टप्पा नाविन्यपूर्ण उपक्रम उपक्रम अंतर्गत जिल्हयात तालुकास्तरावर विशेष सहाय्य योजनेअंतर्गत 100 टक्के DBT पूर्ण करणे,धरती आभा योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या 113 गावांचे Village Vision Dacument तयार करणे,आयुष्यमान भारत कार्ड बाबत जनजागृती करणे व कार्ड वाटपाकरीता शिबिरांचे आयोजन करणे,अधिकारी/कर्मचारी यांची सेवा पुस्तके 100 टक्के संगणकीकृत करणे, सर्व पात्र कर्मचाऱ्यांना मराठी हिंदी भाषा परीक्षा सुट, स्थायित्व प्रमाणपत्र, आश्वासित प्रगती योजना इ. लाभ देणे,पनवेल, उरण, पेण, खालापूर इ. तालुक्यांमध्ये तृतीयपंथी नागरीकांच्या याद्या तयार करून त्यांना ओळखपत्रे वितरीत करणे,आदिवासी समाजास तात्काळ जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न् प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे, महा-ई-सेवा केंद्रांची तपासणी करणे व सदर ठिकाणी नागरीकांचे Feedback Register ठेवणे तसेच संपूर्ण माहितीकरीता QR Code तयार करणे,प्रत्येक गावाला स्मशानभूमी व स्मशानभूमीकरीता रस्ता उपलब्ध करून देणे, स्मशानभूमी Geo Tagging करणे,जिल्हयातील वोरमाता, वीरपत्नी तसेच सेवेत असणारे सैनिक त्यांचे नातेवाईक यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या समजून घेणे व त्याबाबत उपाययोजना करणे.
रायगड जिल्ह्यात पंधरा तालुक्यात शाळा तेथे सेवा केंद्र उपक्रम राबविण्यात येणार असल्याची देखील माहिती जिल्हा धिकारी किशन जावळे यांनी यांनी दिली आहे.
10. प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक शाळा/महाविद्यालय येथे सेतु केंद्र सुरू करणे 15 दिनार्थ श
----
पहिला टप्पा दिनांक 17 सप्टेंबर 2025 में 22 सप्टेंबर 2025 पाणंद रस्ते विषयक मोहिम
दुसरा टप्पा दिनांक 23 सप्टेंबर 2025 से 27 सप्टेंबर 2025 सर्वांसाठी घरे या उपक्रमासाठी पूरक उपक्रम
तिसरा टप्पा दिनांक 28 सप्टेंबर 2025 ते 02 ऑक्टोबर 2025 नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे
या तीन टप्प्यात अभियान राबविण्यात येणार आहे.
