Home

हेलपाटा " कादंबरीला पुरोगामी, सामाजिक, सांस्कृतीक महासंघ छञपती संभाजीनगर यांचा ' महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहिर '...!


" हेलपाटा " कादंबरीला पुरोगामी, सामाजिक, सांस्कृतीक महासंघ छञपती संभाजीनगर यांचा ' महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहिर '...!


अलिबाग (प्रतिनिधी)


           तानाजी धरणे लिखित संघर्षमय हृदयस्पर्शी कादंबरी  'हेलपाटा ' या कादंबरीला पुरोगामी सामाजिक ,सांस्कृतिक महासंघ छञपती संभाजीनगर यांचा ' महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहिर ' झाल्याचे संघाचे सर्वेसर्वा मा . श्री .समाधान दहिवाळ यांनी कळवले असुन एका शानदार साहित्य संमेलनात तो  श्री . तानाजी धरणे हेलपाटाकार यांना प्रदान करणेत येणार आहे संघर्षमय हृदयस्पर्शी हेलपाटा कादंबरीला आजवर महाराष्ट्रातील अनेक नामवंत संस्थांनी गौरविले असुन हा हेलपाटा कादंबरीला प्राप्त झालेला १९  वा  पुरस्कार आहे . गेली दोन वर्ष समाजमाध्यमावरती बहुचर्चित असलेल्या या कादंबरीच्या आजवर हजारो प्रती गेल्या असुन हेलपाटाची लवकरच पाचवी आवृती नविन ढंगात प्रकाशित होत आहे . सतेच  हेलपाटावरती " हेलपाटा समिक्षा व अभ्यास हा समिक्षा ग्रंथही लवकरच प्रकाशित होत आहे . प्रा . श्री . धनंजय काळे यांनी पी. एच . डी . संशोधन प्रबंधासाठी ज्या दहा कादंबर्‍या निवडल्या आहेत त्यात हेलपाटा कादंबरीचा समावेश असुन त्यावरती  "स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे पी . एच डी . संशोधन सुरु आहे .आजवर हेलपाटाची पंच्याहत्तरपेक्षा जास्त मान्यवरांनी परिक्षणे केली असुन दस्तुरखुद्द महान गीतकार व ज्येष्ठ  साहित्यिक प्रविण दवणे तसेच निवृत्त मुख्य संपादक सकाळ माध्यम समूह , पूर्वाध्यक्ष, ८४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन , ठाणे सन २०१० व  " आई समजुन घेताना " या कादंबरीचे लेखक ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत मा . उत्तम काबंळे यांनी ही पञ पाठवून हेलपाटाचं तोंडभरुन कौतुक केले आहे . गेली दोन वर्ष सतत वाचकांच्या मनाचा ठाव घेणार्‍या  'हेलपाटा कादंबरीचे ' सर्वञ खुप कौतुक होत असुन लेखक म्हणुन ही सुखावणारी बाब असल्याचं मत तानाजी धरणे यांनी व्यक्त केले . तसेच हेलपाटा कादंबरीवरती वाचकांनी समिक्षकांनी भरभरुन प्रेम दिले . त्या सर्व ज्ञात-अज्ञात मायबाप चाहत्यांचे आभार मानले . 

Previous Post Next Post