कॉंग्रेस तगडे आणि अभ्यासू उमेदवार देणार : महेंद्रशेठ घरत
अलिबाग (वार्ताहर)
महापालिका व नगरपालिकांच्या यशानंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी कॉंग्रेस सज्ज झाली आहे.
रायगड जिल्ह्यात तगडे, अभ्यासू आणि निष्ठावंत उमेदवार उभे केले जातील, तसेच तरुणांना संधी दिली जाईल, असा विश्वास कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी व्यक्त केला.
शेलघर येथे झालेल्या आढावा बैठकीत संभाव्य उमेदवारांची चाचपणी करण्यात आली.
महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवल्या जातील, तर जिथे शक्य असेल तिथे स्वबळावर उमेदवार उभे केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कॉंग्रेस ही केवळ पक्ष नसून एक विचारधारा आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सन्मान केला जाईल आणि त्यांच्या भावनांचा आदर ठेवूनच निर्णय घेतले जातील, असेही यावेळी सांगण्यात आले.
रायगडमध्ये कॉंग्रेसला निश्चितच भक्कम यश मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
