मधुबन कट्ट्यावर बालकविसंमेलन संपन्न
रायगड (विशेष प्रतिनिधी)
उरण कोमसाप तर्फे दर 17 तारखेला संपन्न होणा-य्या उरण विमला तलाव येथील मधुबन कट्ट्यावर 17 मार्च 2025, रोजीबा लकवी संमेलन संपन्न झाले.
उरण कोमसाप बालविभाग प्रमुख श्री.संजीव पाटील सर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कविसंमेलनात रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डाऊरनगर, नवीन शेवे,कोंढरी, एन.आय. हायस्कूल आणि कुंडेगाव येथील एकूण 27 मुलांनी सहभाग नोंदवला होता. बालकवी अनुज शिवकर, ज्योती नुलके, प्रतिक्षा संकुडे,रितीका भोईर, अनामिका राम ,तन्वी पाटील आदी बालकवींनी स्वरचित आणि नामवंत कवींच्या कवितांचे सादरीकरण करून श्रोतेवर्गाला मंत्रमुग्ध केले.या वेळेस प्रमुख अतिथी म्हणून कोमसाप जनसंपर्क अधिकारी रायगड भूषण प्रा.एल बी पाटील, कोमसाप बालविभाग प्रमुख प्रकाश राजोपाध्ये, कोमसाप खोपोली शाखेचे प्रतिनिधी नरेंद्र हर्डीकर, सूर्यकांत सरोदे,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ उरणचे अध्यक्ष महेंद्र गावंड ,श्री.राजेश चोगले , श्री.नरेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.श्री.भरत पाटील,अजय शिवकर, मारूती तांबे आणी कोंढरी शाळेचा पालकवर्ग, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या दुस-या सत्रात आगरी,कोळी आणि कराडी या समाजात लग्न कार्यात धार्मिक विधी करण्याचे काम करणाऱ्या आणि धवलगीते गाणा-या महिला वृध्द मातांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी श्रीम.चंद्राबाई गणपत पाटील (केळवणे), श्रीम.अनुबाई पांडुरंग ठाकूर (कोंढरी) ,श्रीम.सुमन काशिनाथ पाटील (कुंडेगाव) या जेष्ठ महिलांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित चिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छदेऊनसन्मानकरण्यात आला. त्याच प्रमाणे शैक्षणिक उपक्रम राबवणा-या आणि वारी उपक्रमाची हे पुस्तक लिहिणा-या नवोदीत लेखीका सौ.शर्मिला गावंड (पिरकोन) आणि कोमसाप राज्यस्तरीय समूहावर दोहे या काव्य प्रकारावर मराठी भाषेत दोहे लेखन सदर सुरू केल्याबद्दल श्री.नरेंद्र पाटील (अलिबाग) यांचा देखील सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिका सौ. रंजना केणी यांनी केले.
बालकविसंमेलन यशस्वी करण्यासाठी कोमसाप उरण शाखाध्यक्ष श्री.मच्छिंद्रनाथ म्हात्रे त्याच प्रमाणे मधुबन कट्टा अध्यक्ष राम म्हात्रे कोमसाप उरण शाखेचे सचिव श्री.अजय शिवकर , सदस्य श्री. भरत पाटील, श्रीम.समता ठाकूर , दौलत पाटील ,श्री.किशोर पाटील आदींनी विशेष मेहनत घेतली.

