Home

श्रीगाव प्रिमीयर लिग क्रिकेट स्पर्धेत सावी इलेव्हन विजेता


 

श्रीगाव प्रिमीयर लिग क्रिकेट स्पर्धेत सावी इलेव्हन   विजेता 

श्रीगाव(सचिन पाटील)

अलिबाग तालुक्यातील श्रीगाव येथे ग्रामस्थ मंडळ श्रीगाव यांच्यातर्फे दि. 13 मार्च रोजी होळी निमित्त श्रीगाव प्रिमीयर लिग क्रिकेट स्पर्धेचे आयोजित करण्यात आले होते

या मध्ये गावातील दहा संघ सहभागी झाले होते.या प्रथम क्रमांक प्रविण पाटील यांचा सावी ईलेव्हन, द्वितीय क्रमांक सत्यम पाटील यांचा लक्ष्मी नारायण वारियर्स, तृतीय क्रमांक सुनिल कुथे यांचा लक्ष्मी नारायण ब्लास्टर्स, चतुर्थ क्रमांक महेश बैकर यांचा ऍड. महेश  फायटर्स या सर्व विजयी संघाना जिवंत कोंबड्या व आकर्षक चषक देण्यात आले स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज हरेश पाटील, उत्कृष्ट फलंदाज अनिकेत कुथे, सामनावीर प्रतिक पाटील, मालिकावीर चेतन पाटील, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आशितोष पाटील याना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले


Previous Post Next Post