Home

अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला; लिलावती रुग्णालयात उपचार सुरू


 

अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला; लिलावती रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई(वार्ताहर)

 बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. वांद्रे येथील राहत्या घरी शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सध्या सैफला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. 

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर घरात घुसलेल्या चोरानं चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्री अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सैफ अली खान याच्या मुंबईतील घरात बुधवारी रात्री एक चोर शिरला होता. चोराला पाहून सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांनी आरडाओरड सुरू केला. त्यावेळी सैफ अली खानला जाग आली. खोलीतून बाहेर आल्यानंतर सैफ अली खान आणि चोर आमनेसामने आले. यावेळी चोरानं पकडलं जाण्याच्या भीतीनं त्याच्याकडील चाकूने सैफ अली खानवर वार केले. यामध्ये सैफ अली खानला दुखापत झाली आहे. त्याला तातडीनं मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सैफ जखमी झाल्यानंतर घरातील नोकरांनी त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. या गोंधळात चोरानं पळ काढला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी या घटनेची गंभीरतेनं दखल घेतली असून चोराला शोधण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे पथक कामाला लागलं असल्याचे समजते.

Previous Post Next Post