आईचे माहेरपण...
सहज मनात आलेले सर्व साधारण विचार शब्दांत मांडलेत..
आजकाल मुली आईला माहेरपण देतात पण किती मुले
माहेरपण यांचा अर्थ समजून आईला जपतात???
आज जरा वेगळा विषय आहे. माहेर हा शब्द समस्त महिलांना जिव्हाळ्याचा आहे पण कधीकधी पुरुषांना सुद्धा माहेरी जावेसे वाटते आई च्या छत्रछायेखाली तणावमुक्त रहावेसे वाटते...काहीजण तसे जातात पण आई त्यावेळीही मुलांना माहेरपण फार प्रेमाने देते..
आज हा प्रश्न फक्त मुलांसाठी जास्त विचारावासा वाटते...
मुली निःसंशय आईला नक्की जपतात तेही घर संसार सांभाळून!!!!मग किती मुले आईच्या बाबतीत मुली वागतात तसे वागतात का!??
आईला फार काही नको असते फक्त मुलांचे अस्तित्व ,त्याचा सुखी संसार व त्यांचा आनंद बघावासा वाटतो...मुलांना आईच्या भावना समजाव्यात ह्या साठी लेख प्रपंच...अस पूर्वी म्हणायचे..
लेकीच्या माहेरचा साठी
आई सासरी नांदते....
पूर्वीच्या काळी लहान वयात लग्न होतं असतं.त्यावेळी सणावाराला, कार्यक्रमाला माहेरी नेत असत.आता तसं नाही.आजच्या विसाव्या शतकात मुले मुली समान झाल्याने मुलींना स्वातंत्र्य मिळाले व मनासारखे जगता येऊ लागते.मात्र मातृत्व प्राप्त झाल्यावर सर्व जबाबदाऱ्या उत्तम पार पाडण्याचे काम आईचेच झाले. आपली मुले जगण्यायोग्य, जबाबदार पुरुष होण्यासाठी आई २५,२६वर्षे सहज कष्टावते
तेही निरपेक्ष पणे.संसार चा राम रगाडा, नोकरी व मुले यांचे करता करता आई चे आयुष्यच पणास लागते.माहेरपण तर त्यामुळे गरजेपुरते उरते.
पण खरी गंमत तर मुलांची लग्ने झाली की येते....
मुली हक्काने माहेरी येतात...सुना माहेरी जातात...वरवर सर्व काही आलबेल असते...पण त्या आईला कधीच विश्रांती नसते.
सुना आईला विश्रांती व कौतुक करण्यासाठी, घरी आणतात व यथासांग पाहुणचार करतात.पण मुलांच काय??? आयुष्यभर आपला मुलगा परिपूर्ण माणूस व योग्य जगावा म्हणून आपले आयुष्य खर्ची घालणाऱ्या आईला माहेरपण देतात का????आईसाठी वेळ काढून तिची हौसमौज पुरवून तिला समजून समाधान देतात का???
बायको ही जीवनसाथी जरुर आहे तिलाही जपा पण त्याबरोबरच आपले जीवन ज्यामुळे असे सुंदर झाले तिची उपेक्षा करु नका.
बायको व आई ह्यांचा समन्वय साधून जगा.माझ्या माहितीत कायम परदेशी रहाणारा ७०वर्षाचा मित्र आपल्या आई करिता दरवर्षी तीन महिने माहेरी येतो...बायको सह किंवा बायको शिवाय....आई जर ९महिने एकटी रहाते तर आई प्रती कर्तव्य व प्रेम जपणे महत्त्वाचे. त्याची जाण मनाला ठेवणारा आई सोबत तीन महिने एकमेकांच्या सहवासाचा आनंद लुटतात,आईपण लेकाला लेकी सारखे माहेरपण देते व अनेक आठवणींना उजाळा देते.ते तीन महिने ते फक्त आई मुलगा ह्या नात्याचा आनंद घेतात.आईला फिरुवून आणणे,तिच्या इच्छा पूर्ण करणे,तिला तिच्या आवडीचे खाद्यपदार्थ देणे व,हवे नको पहाणे.. उत्तम डाक्टर यांची सेवा कायम स्वरुपी उपलब्ध करून देणे..ही काम मनापासून करणे हेच तर आईचे खरे माहेरपण...
पैसा खुप असला तरी जिव्हाळा व नैसर्गिक ओढ,माया फार म हत्वाची आहे.मुली मिळवत्या असो,नसो आपली जबाबदारी समजून
मुली आई करिता आपणहून खुप करतात..
पण मुले मुली समान असतात तर मुलांनीही आईला माहेरपण दिलेच पाहिजे.दिवसातला तासभर आईला द्या व तिच्या जवळ बसुन चौकशी करा,तिला हवे नको विचारा ,सारे बायकोवर टाकूनआपण काहीच न करावे असे वागु नका.तुमच्या आई व बायकोच्या नात्यांत फरक आहे..तो कमी करा व आईच्या आत्माचे समाधान मिळवा...
आईचा राग राग करु नका...आजचे तरुणपण उद्या म्हातारपणात जाणार आहे... जनरेशन गॅप न वाढवता ती कमी होऊन एकसंध करायचा प्रयत्न करा.आईच माहेरपण पैश्यात तोलून नका...ते फार मोठे आत्मिक समाधान आहे.
आपल्याला आई वडील चांगले मिळते हे ही भाग्याचेच आहे त्यांना जपा... आई चे भावविश्व मुले असतात व मुलींना हे जाणवते ,त्या आपल्या आईवडिलांना सुखात ठेवतात,तसेच मुलांनीही
स्वतंत्र पणे विचार करुन पत्नीच्या व आईच्या न पडण्याचा बाऊ न करिता आईलाही समजावून घेत जगावे...आपले सारे आयुष्य आपल्या करिता निस्वार्थी पुणे झोकून देणारी केवळ आईचं असते...
वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आईवडिलांचा आशीर्वाद व आनंद फार मोठा आहे...
आईला जपणे परमेश्वर पूजनांसारखे मानून करा व आयुष्य सार्थकी लावा..
सौ.शिल्पा गायकैवारी.
