माय मराठी अभिमानाची..
सुवर्ण अक्षरांनी उठवली ठसठशीत मोहर..
लखलखत्या मराठीला अभिजात दर्जा सुंदर...
सारस्वतासह सारेच सुखावले...
आनंदाचे पडघम दुमदुमू लागले...
कामाची घेतली शासनाने गगन भरारी...
केलेअभिजात दर्जा देण्याचे काम, शंभर नंबरी...
आभार शासनाचे कसे न किती मानावे...
शिरपेच मानाचे मायमराठी मस्तकी शोभावे....
डंका यशाचा वाजवला साता समुद्रापार...
अभिजात दर्जा देऊन राज्य केले मराठी मनावर...
माझ्या मराठीची थोरवी वर्णू कशी...
सर्वच क्षेत्रातील गगनभरारी कौतुकाची जशी .....
बोल कौतुकाचे मराठी चे खरेच अपुरे...
महत्व तयाचे शासनाने जाणले खरे..
दर्जा दिला मग अभिजात..
जसा बहरला अंगणी पारिजात...
मराठी माय माझी कौतुकाने नटवली....
साऱ्या जगात अभिमानाने मिरवली....
देखणा आहे मराठी चा तोरा...
साहित्य जगतातला मानाचा हिरा.....
खरतर शासन आमचेच..
आम्ही सारेच शासनाचे..
बंध हे आहेत सुवर्ण धाग्याचे...
आभार मानून परके का करायचे....
झेंडा मराठी चा नाचवत ठेवायचा...
जीवापलीकडे मराठी माणसाने जपायचा....
लिहा मराठी,बोला मराठी,
वाचा मराठी... अभिमानाने सांगा मी मराठी.....
अभिमानाने
सांगा मी मराठी.......
मी मराठी...
सौ.शिल्पा गायकैवारी.
पुणे 5.
मो.नं.9850057437
