Home

रायगड जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून अलिबाग-रेवदंडा मार्गावर वाहतूक बंदीची अधिसूचना जारी


 रायगड जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून अलिबाग-रेवदंडा मार्गावर वाहतूक बंदीची अधिसूचना जारी

अलिबाग प्रतिनिधी  राजेश बाष्टे।


 रायगड जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून अलिबाग-रेवदंडा मार्गावर वाहतूक बंदीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अलिबाग-कुरूळ-बेलकडे-सहाण बायपास-नागाव-रेवदंडा आणि अलिबाग-कुरूळ-नवेदरबेली-आक्षी-नागाव-रेवदंडा या दोन्ही रस्त्यांवर सिमेंट काँक्रीटीकरण, मोरी आणि पुलांची कामे वेगाने सुरू असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.


या रस्त्यांवरील कामांमुळे अनेक ठिकाणी रस्ते अरुंद झाले आहेत. त्यामुळे एकाच वेळी दोन वाहने पास होऊ शकत नाहीत, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. याचा त्रास शालेय विद्यार्थी, स्थानिक नागरिक, पर्यटक, रुग्णवाहिका चालक आणि अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी हा आदेश दिला आहे.


अधिसूचनेतील प्रमुख मुद्दे:

•   वाहतूक बंदी कालावधी: दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ पासून ३१ मे २०२६ पर्यंत दररोज सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत आणि सायंकाळी ५.०० ते ७.०० वाजेपर्यंत जड-अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद राहील. •   अपवाद: दूध, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला आणि पाणी यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना या नियमातून वगळण्यात आले आहे. •   मार्गाचे नाव: अलिबाग-कुरूळ-बेलकडे-सहाण बायपास-नागाव-रेवदंडा आणि अलिबाग-कुरूळ-नवेदरबेली-आक्षी-नागाव-रेवदंडा. 

जिल्हादंडाधिकारी (किशन ना. जावळे) यांनी ही अधिसूचना महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम ११५ व ११६ नुसार काढली आहे. स्थानिक नागरिक, विद्यार्थी, पर्यटक यांचा प्रवास सुखकर व्हावा आणि अपघात टाळावे, हा या आदेशामागील मुख्य उद्देश आहे.R पोलीस अधीक्षक, रायगड-अलिबाग यांनी दिलेल्य प्रस्तावानंतर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी याची खात्री केली आहे.

Previous Post Next Post