Home

जयश्री बोरसे यांना आदर्श शिक्षिका प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार प्रदान

जयश्री बोरसे याना आदर्श शिक्षिका प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार  प्रदान

कल्याण( कल्याण)

        रविवार,दि.२५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार २०२४ समिती महाराष्ट्र राज्य समिती अंतर्गत १८७ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक,आरोग्य कला,साहित्य, क्रीडा,पत्रकारिता अशा वेगवेगळ्या स्तरातील मान्यवरांना गौरविण्यात आले. शिक्षिका,कवयित्री म्हणून कार्यरत असणाऱ्या, मुलांसाठी सतत विविध उपक्रम राबवणाऱ्या, विविध सामाजिक सांस्कृतिक समितीवर सक्रिय सदस्य म्हणून ओळखला जाणाऱ्या सौ जयश्री पंकज बोरसे, कल्याण ( बालभवन मराठी प्राथमिक शाळा,अंबरनाथ) यांना आदर्श शिक्षिका प्रजासत्ताक अमृतगौरव पुरस्कार २०२४ ने सन्मानित करण्यात आले.

        या कार्यक्रमाला अध्यक्ष श्री बाळासाहेब तोरस्कर (ज्येष्ठ साहित्यिक मुंबई), उद्घाटक डॉक्टर मावळे (उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समिती), स्वागताध्यक्ष प्राध्यापक नागेश हुलवळे ( अध्यक्ष वर्ल्ड विजन संस्था मुंबई ), प्रमुख पाहुणे डॉक्टर जी डी यादव ( अध्यक्ष राष्ट्रीय विज्ञान संस्था ), डॉक्टर डेरिक एंजल्स ( नासा शास्त्रज्ञ ) डॉक्टर खांडेकर ( दैनिक प्रहार संपादक) प्रमोद महाडिक( नॅशनल लायब्ररी ) श्री भानुदास केसरे,रामकृष्ण कोळवणकर, डॉक्टर नॅन्सी अल्ब्युकर्स ( महिला,बालकल्याण समिती ) मान्यवर लाभले होते. आयोजक समितीतील मा.प्रमोद सूर्यवंशी, मा. योगेश पाटील मा. योगेश हरणे या सर्वांनी केलेल्या कार्याचे फलित म्हणजेच हा भव्यदिव्य कार्यक्रम नॅशनल लायब्ररी बांद्रा येथे अविस्मरणीय असा पार पडला.

Previous Post Next Post