Home

श्रीगाव येथील शाळेतील विद्यार्थ्यांना किशोर सुतार यांजकडून मोफत ओळखपत्रांचे वाटप


 

श्रीगाव येथील शाळेतील विद्यार्थ्यांना

श्रीगाव येथील शाळेतील विद्यार्थ्यांना किशोर सुतार यांजकडून मोफत आयडी ओळखपत्रांचे वाटप


अलिबाग (सचिन पाटील)


 अलिबाग तालुक्यातील श्रीगाव येथील रा‌.जी.प.प्राथमिक मराठी शाळा व उर्दू शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना किशोर फोटोज चे किशोर सुतार यांच्या वतीने स्वातंत्र्यदिन अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून मोफत आयडी कार्डचे वाटप करण्यात आले. आपण कमावलेल्या पुंजीतून समाजाचे देणे लागतो यानूसार किशोर सुतार व त्यांच्या पत्नी किशोरी सुतार ह्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत आयडी कार्ड वाटप करत असतात तसेच आदीवासी बांधवांना अल्पदरात फोटो काढून देतात या समाज सेवेबद्दल त्यांचे मराठी शाळा ‌व उर्दु शाळा श्रीगाव शिक्षक वर्ग,पालक वर्ग यांनी आभार मानले


Previous Post Next Post