Home

इंडियन स्ट्रीट प्रिमियर लीगचे रजिस्ट्रेशन अलिबाग मध्ये


इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगचे रजिस्ट्रेशन अलिबाग मध्ये


चित्रलेखा पाटील यांच्या प्रयत्नांना यश


 | अलिबाग | प्रतिनिधी |


देशातील सर्वात मोठी टेनिस क्रिकेट स्पर्धा म्हणून लोकप्रिय असणारी तसेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन आणि अनेक सुपरस्टार ज्या क्रिकेट स्पर्धेसोबत जोडले गेले आहेत अशा टेनिस क्रिकेट स्पर्धेत स्थानिक खेळाडूंना संधी मिळावी यासाठी राज्यातील पहिला प्रयत्न चित्रलेखा पाटील यांच्यावतीने करण्यात येत आहे.

अलिबाग - मुरुड - रोहा तालुक्यातील सर्व क्रिकेटर्ससाठी ISPL लीग २०२४ टेनिस क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्याची शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख, युव्ही स्पोर्ट्सच्या अध्यक्षा चित्रलेखा नृपाल पाटील यांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी मिळणार आहे.

इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग टी 10 टूर्नामेंट ( ISPL ) सीझन २ हि स्पर्धा मुंबई येथे पार पडणार आहे. यांचे संघ मालक हे प्रसिद्ध सिलेब्रेटी तसेच देशाच्या प्रत्येक राज्यातून ह्या स्पर्धेत खेळाडू निवडले जाणार आहेत.

 शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख, यूव्ही स्पोर्ट्सच्या अध्यक्षा चित्रलेखा नृपाल पाटील यांच्या माध्यमातून अलिबाग वेश्वी हॉटेल मॅपल आयव्ही येथे १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत स्पर्धेतील खेळाडूंचे रजिस्ट्रेशन केले जाणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पहिल्या १०० क्रिकेटवीरांचे रजिस्ट्रेशन मोफत असणार आहे जास्तीत जास्त खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा असे चित्रलेखा पाटील ऊर्फ चिऊताई यांनी जाहीर केले आहे.  

यावेळी मा. नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख, यूव्ही स्पोर्ट्सच्या अध्यक्षा, मा. नगरसेविका  चित्रलेखा नृपाल पाटील, मा. उपनगराध्यक्ष अँड. मानसी म्हात्रे, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिसशनचे सेक्रेटरी मा. नगरसेवक प्रदीप नाईक, अनिल चोपडा, प्रसिद्ध समालोचक संदीप जगे, ISPL सिलेक्शन कमिटीचे अमरजीत गाध्री व इतर कमिटीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. सहभागी स्पर्धकांनी येताना आधारकार्ड, पॅनकार्ड आणि दोन फोटोज घेऊन यावेत. प्रथम येणार्‍या १०० खेळाडूंचे रजिस्ट्रेशन नोंदणी विनामूल्य असणार आहे तर १०० च्या पुढील सर्व खेळाडूंना ११७९ रुपये एवढे नोंदणी शुल्क असणार आहे. सदरचे नोंदणी शुल्क हे फक्त गूगल पे, फोन पे, पेटीएम द्वारेच भरता येणार आहे असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आलेले आहे.





 

Previous Post Next Post