Home

खेळ चाले रोजचाच.. कवयित्री जान्हवी भोईर


 


खेळ रोजचाच चाले


हा खेळ रे सावल्यांचा 

खेळे कसा लपंडाव

नाना भयाचे डोंगर

करीतो उरास घाव...१


अश्रू असे अंतरात

पिवूनी हुंदका घेतो

जीव मानसी व्याकूळ

परी नाही दाखवतो...२


व्याकुळ जीवास नाही

आधार कुणाचा होतो

अकस्मात येतो वारा

जीवाशी असुर न्हेतो...३


पाण्यात खेळते खेळ

मासोळी परी ती एक

पाण्याविना पराजीत 

घायाळ जीव प्रत्येक...४


कुशितूनी ममतेच्या

जीव एक जन्म घेतो

भोगी मरण यातना

गुदमरतो गुसमटतो...५


हा क्षणभंगूर जीव

दोन दिसांचा पाहुणा 

येतो अन् जातो कधी

कळतही नाही कुणा...६


खेळ रोजचाच चाले 

भूतकाळ भविष्याचा

वर्तमान चोरी कुणी

हिशेब नाही कर्माचा..७


सौ जान्हवी भोईर

नवी मुबई नेरुळ*


Previous Post Next Post