Home

एम डी फाउंडेशन आयोजित क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम स्थानिकांसाठी वेगळी पर्वणी-आमदार महेंद्र दळवी


 

तलवार मैदानावर एम डी फाऊंडेशन आयोजित 

 क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम स्थानिकांसाठी वेगळी पर्वणी - आम.महेंद्र दळवी

अलिबाग - अमुलकुमार जैन 

रायगड जिल्ह्यातील तलवार मैदानावर एम डी फाऊंडेशन आयोजित टेनिस क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम स्थानिकासाठी वेगळी पर्वणी असल्याचे  प्रतिपादन अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांनी राजमळा येथे महेंद्रशेठ दळवी फाऊंडेशन पुरस्कृत दमदार आमदार प्रीमिअर लिग२०२४च्या आयोजित पत्रकार परिषदेत केले.

  यावेळी शिंदे गटाचे जिल्हा राजा केणी, अलिबाग तालुका संघटक अनंत गोंधळी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष निगडे, डॉ. नार्वेकर राजाराम हुलवान यांच्यासहित आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार दळवी म्हणाले की, एम डी फाऊंडेशन आयोजित पर्व तिसरे पण क्रिकेट मधील पर्व पहिलेची सुरवात दिनांक 4 मार्च ते 7 मार्च 2024 दरम्यान अलिबाग तालुक्यातील थळ ग्राम पंचायत हद्दीतील राजमळा येथील तलवार मैदानावर रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक पारितोषिके असलेली स्पर्धा म्हणून खेळाडूंना एक वेगळी दिशा देणारी स्पर्धा ठरणार आहे. या खेळातून स्थानिक खेळाडूंना हक्कांचे व्यासपिठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे, असे गौरवोद्गार आमदार महेंद्र दळवी  यांनी काढले.

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टेनिस क्रिकेट खेळाला मिळालेली व्याप्ती आणि खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी त्यांना दर्जेदार आणि व्यावसायिक व्यासपीठ (प्लॅटफॉर्म) मिळण्याच्या दृष्टीकोनातून रायगड जिल्ह्यामध्ये टेनिस क्रिकेट स्पर्धा विशेषतः ग्रामीण भागातील या सर्व खेळाडूंना एकत्रित करून त्यांच्याकरीता ही स्पर्धा आयोजित करणे अत्यावश्यक आहे या दृष्टीकोनातूनच एम डी फाऊंडेशनने. या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

या स्पर्धेमध्ये वर उल्लेख केलेल्या विधान सभा मतदार संघातील तिनही तालुक्यातील २४ संघ सहभागी होणार आहेत.विशेष म्हणजे या स्पर्धा आयपीएलच्या धर्तीवरती दिवस-रात्र प्रकारामध्ये खेळविली जाणार आहे.या स्पर्धेचा शुभारंभ हा ४ मार्च २०२४ रोजी सायंकाळी करण्यात येणार असून इतर दिवशी हे सामने दुपारी एक वाजल्यपासून सुरू होणार आहेत.विद्युत प्रकाशझोतातील क्रिकेटपटूंना खेळण्याचा अनुभव मिळावा आणि त्यातून भविष्यातील भारतीय संघात या खेळाडूंचे स्थान निश्चित व्हावे अथवा त्यांना संधी मिळावी हा प्रामाणिक दृष्टीकोन ठेवून ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.  या स्पर्धेतील खेळाडू यांचा एकत्रित खेळाडूंची लिलाव (ऑक्शन) पद्धतीने निवड ही होरिझोन हॉटेल येथे करण्यात आला. या स्पर्धेची पारितोषिके आजवर जिल्ह्यात आयोजित केलेल्या स्पर्धापेक्षा सर्वाधिक रकमेची आणि आकर्षक स्वरूपाची असणार आहे.

यावेळी त्यांनी सांगितले की या स्पर्धेत प्रथम क्रमांकसाठी सहा लाख रुपये रोख आणि चषक, द्वितीय क्रमांकसाठी चार लाख रुपये आणि चषक, तृतीय पारितोषिक क्रमांकसाठीदोन लाख रुपये आणि चषक,चतुर्थ,पाचवा आणि सहावा क्रमांकसाठी प्रत्येकी एक लाख रुपये आणि चषक असे पारितोषिके ठेवण्यात आली असून याव्यतरिक्त मॅन ऑफ दी सिरीज, उत्कृष्ठ फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि विजेता संघ मालक यास प्रत्येकी एक मोटर सायकल ही पारितोषिक स्वरूपात प्रदान करण्यात येणार आहे.

तसेच स्पर्धेत निवड झाल्यापासून सर्व मॅन ऑफ दी मॅच साठी सायकल तसेच स्पर्धेतील सर्व मॅन ऑफ दी मॅच साठी शूज, टी शर्ट व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती या वेळी आमदार महेंद्र दळवी यांनी दिली.

सदर स्पर्धेचे उद्घाटन कल्याणचे खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे, रायगडचे खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थित होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार, क्रीडा मंत्री बनसोडे,पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण,महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले, सर्वश्री आमदार संतोष बांगर, महेंद्र थोरवे, प्रशांत ठाकूर, रविंद्र पाटील, महेश बालदी, जिल्हाधिकारी किसन जावळे, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे उपस्थित राहणार आहेत.

विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांसाठी देखील भव्य दिव्य गॅलरी उभारण्यात येणार असून स्पर्धा अधिक आकर्षक करण्याच्या दृष्टीकोनातून स्पर्धेचे थेट प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून घराघरात करण्यात येणार आहे. तसेच मैदानामध्ये देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचे एलईडी स्क्रीन उभारण्यात येणार असून मैदानाच्या बाहेर असणाऱ्या प्रेक्षकांना देखील या सामन्याचा आनंद लुटता येणार आहे.  गॅलरी उभारण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

या स्पर्धेत खेळणारा खेळाडू मुरुड तालुक्यातील शिघ्रे येथील हुसेन टक्के यांच्यावर अधिक बोली लागली आहे. त्या खेळाडूस सायकल प्रदान करण्यात आली आहे.ज्या

 खेळाडूवर बोली लागली नाही त्या खेळाडूचा एक प्रेक्षणीय सामना तिसऱ्या दिवशी खेळविण्यात येणार आहे त्यामधील विजयी संघास दहा हजार रुपये देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अतिम सामन्यापूर्वी रायगड विरुद्ध ठाणे यांच्यात सामना होणार आहे यामधील विजयी संघास पन्नास हजार रुपये पारितोषिक स्वरूपात प्रदान करण्यात येणार आहे.



Previous Post Next Post