Home

गणपत वाणी... कवयित्री सुलक्ष्मी बाळगी

 गणपत वाणी 


गणपत वाणी बिडी पिताना

आठवायचा दिवस पूर्वीचे

हात बांधती पुड्यांत वस्तू 

डोक्यात चाले गणित हिशेबाचे


काळ बदलला मॉल उभरले

बंद उधारी जीपे पहिले

कोण कोठला माल कधीचा 

ऍमेझॉन फ्लिपकार्टची पार्सले 


बाल्य मोबाईलात हरवले

पतंग मांजा बेचकी गेले

हद्दपार लिंबाच्या गोळ्या

विदेशी चॉकलेटचे राज्य आले


पैसा पैसा जमवुन  त्याने

पूंजी जीवनाची जमवली

जुगारात पोराने उडवली

लवजिहादी पोर पळाली 


अनेक युद्धे जगी चालली

सत्तांतरे कित्येक जाहली

गणपतला सोयर ना सूतक 

पण बोटी शाई ना चुकली 


गणपत वाणी बिडी पिताना

रिकामपण खायला येई

मॉल समोरील रांग गाड्यांची

कसेनुसे त्या करून जाई 


दिवस चांगले अजून येतील

म्हणे ही जागा बिल्डर घेईल

उंच इमारत गच्ची वरचे

सगळे फ्लॅट मला तो देईल 


चिमटीमध्ये पकडून बिडी

अंगठा आणिक तर्जनीच्या 

स्वप्ने पाही अंबानी होण्याची

वलयांमध्ये गोल धुराच्या


सुलक्ष्मी सुनील बाळगी , ठाणे

Previous Post Next Post