रामवाडी येथे विहीरीत बुडून तरुणाचा मृत्यू
आलिबाग वार्ताहार (स्वाती जाधव )
रायगड जिल्हयातील सुधागड तालुक्यातील रामवाडी येथे विहिरीत पडून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
या घटनेमुळे परिसरात खळळब उडाली असून गावावर शोकाकूल पसरले आहे.पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार रामवाडी येथील विघ्नेश सुरेश तेलंगे असे या तरूणाचा नाव आहे.
रासळ ग्रामपंचायत हद्दीतील रामवाडी येथे विघ्नेश आपल्या चार मित्रासोबत पोहायला गेला होता.खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे विघ्नेश पाण्यात बुडला या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी पोहचले परंतु विहीर खोल असल्यामुळे व पाणी गढूळ असल्यामुळे शोधकार्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या.
परिणामी स्थानिकांकडून पाली पोलिसांना माहिती देण्यात आली त्यांनी कोलाड येथील रेस्क्यू टिमला त्वरित बोलवले परंतु खुप प्रयत्न करूनही विघ्नेशचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली व रेस्क्यू टिमने विघ्नेशचा मृतदेह बाहेर काढला.मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठविण्यात आला.या घटनेमुळे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला.अवघ्या २१ व्या वर्षी झालेला मृत्यू ग्रामस्थासाठी मोठा धोका ठरला आहे.
या घटनेनंतर नातेवाईक मित्रपरिवार आणि ग्रामस्थानी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती या घटनेचा तपास पाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक उत्तम रिकामे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेची सर्व परिस्थती तपासानंतर स्पष्ट होणार आहे.