Home

आषाढ वारीचे औचित्य साधून, आपल्या लाडक्या बालदोस्तांसाठी साहित्यसंपदा घेऊन येत आहे एक अनोखी ज्ञानवारी!

 आषाढ वारीचे औचित्य साधून, आपल्या लाडक्या बालदोस्तांसाठी साहित्यसंपदा घेऊन येत आहे एक अनोखी ज्ञानवारी!

अलिबाग (वार्ताहर)

धकाधकीच्या आयुष्यात आजकालच्या  मुलांना संतांचे विचार, त्यांचे संस्कार आणि महाराष्ट्राची थोर संस्कृती कळावी, यासाठी आषाढ वारीचे औचित्य साधूनज्ञसाहित्यसंपदा आयोजित 'संतांचिये गावी -प्रश्न मंजुषा स्पर्धा' साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे यांच्या संकल्पनेतून पार पडणार आहे.दिनांक 8-7-26 ते 25.7.26 रोजी दिलीप मोकल लिखित 'संतांचिये गावी' या सदरावर आधारित संत साहित्याच्या माध्यमातून विविध संतांची माहिती लहान मुलांना करून दिली जाणार आहे.महाराष्ट्रातील विविध शाळा सदर उपक्रमात सहभागी होणार असून, सदर शाळेस सहभाग सन्मानचिन्ह आणि सहभाग प्रमाणपत्र पाठविण्यात येईल अशी माहिती  कार्याध्यक्षा सलोनी बोरकर यांनी दिली. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रश्न मंजुषेतील पहिल्या पाच महा विजेत्यांना स्टार्ट गिविंग फाउंडेशन यांच्यातर्फे  प्रायोजक म्हणून  कै. डॉ. अनिश गांगल स्मृती  प्रित्यर्थ बक्षिसे देण्यात येतील असे स्टार्ट गिविंग फाउंडेशन तर्फे किरण बोरकर यांनी जाहीर केले.

  सर्व पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहित करून महाराष्ट्राच्या संत परंपरेची ओळख करून द्यावी असे निवेदन कार्यवाहक मानसी नेवगी यांनी केले आहे.

Previous Post Next Post