बाबा नावाचा सूर्य
बाबा म्हणजे माझे सूर्य एक कष्टकरी.
जाळून स्वतःचा देह
आम्हास प्रेमाची ऊब देते खरी.
झिजतात अहो रात्र मातीमध्ये ते
देण्यास आम्हास आकाशाची उंच भरारी.
कष्ट आहेत अगण्य
पण चेहऱ्यावर नेहमी हास्य स्मित.
हृदयात त्यांच्या अमाप प्रेम
आणि त्याचं मन जणू क्षितिज .
परिवार आमच एक
फूल आणि बाबा आहे देठ.
पाकळ्या प्रमाणे एकत्र
सगळ्यांना सांभाळुन ठेवतात थेट.
करण्यास ईच्छापूर्ती आमच्या
ते स्वतःची ईच्छा मारून जगतात.
जगण्याच कारण आम्ही त्यांच्या
ते त्याचं जीवन आमच्यामध्ये बघतात.
कवित्री पायल राठोड,
यवतमाळ