नवेनगर विहीर परिसरात साचले कचराचे साम्राज्य
आलिबाग वार्ताहार (स्वाती जाधव )
आलिबाग तालुक्यातील पोयनाड हदूदीतील नवेनगर हे एक गाव आहे.या गावामध्ये बहुसंख्य ब्राम्हण व मराठा लोक वासतव्य करतात.
काही दिवसापासून असं निदर्शनास येतोय की नवेनगर विहीर परिसरात नवीन कचरा कुंडी करण्याच्या काही इसामाचा हेतू असल्याचे दिसून येते.
विहीर ही नवेनगर गावाची अमूल्य संपत्ती असून काहीजण तेथे कचरा टाकतात त्यांमुळे तेथील परिसर अस्वच्छ होते.परिणाम डास व हवा प्रदूषित झाल्यामुळे स्थानिकांच्या आरोग्यास धोका होऊ शकतो.पाणी ही प्रदूषित होऊ शकते.
या विहीरीच्या पाण्यावर धुणी भांडी अशा अनेक प्रकारे वापर केला जातो तरी प्रशासनाला ग्रामस्थाच्या वतीने विनंती आहे की नवेनगर गावात योग्य ठिकाणी कचरा कुंडी बसववी जेणेकरून विहीर परिसरात जे काही लोक घाण टाकतात ते टाकणार नाहीत आरोग्य चांगले राहील डासचाही परिणाम योग्य वेळी साफसफाई झाल्यामुळे होणार नाही .
तरी ग्रामपंचायतीला या कचराची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी.आणि अमूल्य संपत्ती म्हणजे विहीर आहे ती अस्वच्छ होण्यापासून वाचावी तरी सर्व ग्रामस्थाच्या या प्रश्नाचा प्रशासनाने गंभीरतेने विचार करावा.