श्रीसमर्थ भारत अभियान, पिंपरी चिंचवड यांच्यातर्फे राज्यस्तरीय श्रीमनाचे श्लोक पाठांतर आणि सूर्यनमस्कार' स्पर्धा २०२६-२७ चे आयोजन
अलिबाग (वार्ताहर)
आपल्या समाजातील प्रत्येक पिढीमध्ये उत्तम विचार, व मूल्यांची जोपासना व्हावी व निकोप मनाची समृध्द पिढी घडावी या हेतूने श्रीसमर्थ भारत अभियान, पिंपरी चिंचवड द्वारे राज्यस्तरीय श्रीमनाचे श्लोक पाठांतर आणि सूर्यनमस्कार स्पर्धा २०२६-२७ आयोजन केले आहे. यामध्ये अगदी लहान बालकांपासून ते थेट थोरा-मोठ्यांपर्यंत कोणतीही व्यक्ति आपापल्या वयोगटानुसार सहभागी होऊ शकते.
स्पर्धेसाठी नियमावली आणि महत्त्वपूर्ण माहिती
१. ही स्पर्धा ३ टप्प्यांमध्ये होईल - शालेय ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये, आंतरशालेय दिवाळी सुट्टी नंतर लगेच व अंतिम टप्पा राज्यस्तरीय स्पर्धा जानेवारी २०२७ ला होईल.
२. या स्पर्धेमध्ये लहान मुलांपासून म्हणजेच बालवाडीपासून ते मोठ्या गटातील पालक, तरुण, वयस्कर, शिक्षक अशा कोणत्याही व्यक्तिला सहभाग घेता येईल.
३. स्पर्धेकरीता श्रीसमर्थ रामदास स्वामी रचित श्रीमनाचे श्लोक पाठांतर व सांघिक सूर्यनमस्कार हे स्वरूप असेल. बालवाडी साठी १ ते ५, छोटा व मोठ्या गटासाठी १ ते १०, १ली व २ री साठी २०, ३री व ४ थी साठी ३५,५ वी व ६ वी साठी ५०, ७वी व ८ वी साठी ६० आणि ९ वी पासून खुल्या गटासाठी १ ते ७० श्लोक असतील.
४. स्पर्धेसाठी प्रत्येक व्यक्तिच्या वयोगटानुसार समाविष्ट करून स्पर्धा घेण्यात येईल.मोठ्या गटामध्ये स्पर्धा २ प्रकार होईल - शिक्षक, पालक, स्त्री, पुरुष, विद्यार्थी, तरुण, वयस्कर कोणत्याही व्यक्तीला १ ते ७० व १ ते २०५ अशा एका किंवा दोन्हीही भागात सहभागी होता येईल मोठ्या सहभागी होता येईल.
५. सूर्यनमस्कार हे सांघिक घालता येतील. छोट्या मुलांसाठी सूर्यनमस्कार नाही. पण ३री व ४थी आणि खुला गट १ ते ७० श्लोकांसाठी ६ सूर्यनमस्कार आणि ५वी पासून १०वी पर्यंत आणि १ ते २०५ लोकांसाठी सहभागी होणाऱ्यांना १२ सूर्यनमस्कार घालावे लागतील.
६. स्पर्धेचे बक्षीस हे प्रत्येक गटात प्रथम ३ क्रमांक व उत्तेजनार्थ २ क्रमांकांना सन्मानचिन्ह दिले जाईल व सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.
७. सूर्यनमस्कार स्पर्धेसाठी जी व्हिडिओ आम्ही पाठवले आहे त्यानुसारच सूर्यनमस्कार ग्राह्य धरले जातील.
८. प्रत्येकी 50 रुपये प्रवेश फी आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:-
शिवकन्या प्रा. सौ. श्रद्धा कौस्तुभ तारे
पनवेल विभाग प्रमुख
श्री समर्थ भारत अभियान
Mob. No. 9665476999