Home

माझ्या मना... कवयित्री वर्षा सचिन रोडे-पाठक

 माझ्या मना 

माझ्या मना, 

थकला असशील ना विचारांची वादळ पेलताना 

कठीण आयुष्य सोप्प करताना....

थोडं थांबून विचार कर जरा 

धावताना थोडा विसावाही बरा 

कधी तरी तुही दमतोस ना रे 

मग स्वतः च सगळं करणार हे नव्हे बरे 

इतरांची काळजी घेतांना तुझ्याकडे लक्ष दे 

पाऊल खुणांना अस्तिवाची जाग दे 

या सुंदर विश्वाकडे पहा तुझ्या सजग नेत्रांनी 

 नाविन्यतेच्या प्रवाहात आणावी

तेजोमयता तुझ्या जाणिवांनी 

 विशाल आभाळाला तू कवेत घ्यावं 

सारं काही तुझ्यासाठी सोहळा व्हावं 

 आपले म्हणताना स्नेहाचे भरते यावे 

 मयूराने सुंदर नृत्य तव काळजात करावे 

 प्रसन्न सकाळ व्हावी धुंद यामिनी यावी 

 सगळ्यांनीच तुझ्या कौतुकाची गोड गाणी गावी 

 मग मात्र तो थकणार नाही विचारांची वादळ पेलताना 

 कठीण आयुष्य सोपं करताना 

 तू गाशील नेहमीच आनंदाची गाणी

आणि मग सारीकडे निनादू लागेल मंजुळ आणि मंगल वाणी!!!! 

सौ. वर्षा सचिन रोडे -पाठक

Previous Post Next Post