Home

मेढेखार येथील पिरबाबांचा मोहरम सण उत्सासाहात साजरा

 मेढेखार येथील पिरबाबांचा मोहरम सण उत्सासाहात साजरा 

अलिबाग (प्रतिनिधी)

अलिबाग तालुक्यातील मेढेखार येथील पिरबाबांचा मोहरम सण दि. २६ जून रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. मेढेखार गावात २०० वर्षांपासून परंपरेनुसार एकही मुस्लिम बांधव नसताना हिंदू बांधव हा पिरबाबांचा मोहरम सण उत्साहात साजरा करतात. हा तसा ११ दिवस चालतो पहिल्या दिवशी कुदळ मारणे, सातव्या दिवशी आल्याभोवती ढोल ताशांच्या गजरात पिरबाबांची स्वारी फिरते आठव्या दिवशी सुनरात नवव्या दिवशी अर्ध्या मेढेखार गावात ढोल ताशांच्या गजरात पिरबाबांची स्वारी फिरते दहाव्या दिवशी सायंकाळपासून रात्रो १२ पर्यंत पिरबाबांचे दर्शन घेऊन नवसाची सैली बांधण्यासाठी मेढेखार गावांसह परीसरातील हिंदू आणि  मुस्लिम  बांधव येतात आणि रात्रौ १२ वाजता पिरबाबांची स्वारी संपूर्ण मेढेखार गावात ढोल ताशांच्या गजरात फिरते. अकराव्या दिवशी सकाळी ९ वाजल्यापासून पिरबाबांचे दर्शन घेण्यासाठी पिरभक्तांची अलोट गर्दी होते मोहरमच्या दिवशी पिरबांना केले नवस फेडले जातात मध्ये गुळाने, पेढ्याने फळांनी तुला केली जाते कोणी बोकड गावठी कोंबडे नारळ पिरबाबांना अर्पण करतात.

Previous Post Next Post