Home

रमाई.... कवयित्री मंगला कुमावत

 रमाई


रमाईचा जन्म झाला ७ फेब्रुवारी १८९८ रोजी वणंदगावला 

आईचे नाव रुक्मिणीबाई वडील भिकु धुत्रे होती समाधान ||


कुटुंब मोठे परंतु लहानपणीच आई गेली देवाघरी

कोवळ्या रमाईच्या मनावर आघात झाला खोलवरी ||


कालांतराने वडिलांचे निधन झाले चिंतेत 

मामासोबत रवानगी झाली मुंबईत ||


बालविवाहाची प्रथा होती तेव्हा समाजात

१९१६ मधे लग्न झाले भायखळ्याच्या जागेत थाटात ||


बाबासाहेब आंबेडकरांचे वय होते फक्त १४ वर्ष

रमाई चिमुकली होती वय होते ९ वर्ष ||


रमाईने खूप संघर्ष केला आपल्या जीवनात

पतीच्या शिक्षणासाठी पाठवले तिने परदेशात ||


एकट्या पडल्या रमाई दुःखी कष्टी होऊन

जिद्दीने दुःख अडचणीवर मात केली रमाईन ||


पतीची स्वाभिमानी पत्नी होती ती  एक

कष्टाने जीवन जगत होती समाजात ||


समाजाची मदत नाकारली तिने स्वाभिमान 

उदर निर्वाहासाठी शेण, गोवऱ्या वेचल्या वनात ||


दोन्ही मुलांचा मृत्यू पहिला एकट्या महिलेनं 

मुलांच्या निधनाचे दुःख सांगितले नाही पत्नीन ||


कष्ट करून त्यांचे शरीर पोखरत गेले एक दिवस

२७ मे १९३५ रोजी प्राण ज्योत मावळली कष्टात ||


रमाईचे बलिदान विसरणार नाही भारत देश

वंदन करते मी मातेला दोन्ही हात जोडून ||


सौ. मंगला सुधाकर कुमावत.

सेवानिवृत्त मुख्याध्यापिका

माध्यमिक विद्यालय, गणेशपुर.

चाळीसगाव. जिल्हा. जळगाव.

मो. ९४०५४४६२९२.

Previous Post Next Post