Home

गौतमी पाटीलने आपल्या अदाकारीने रसिकांना जिंकले



 गौतमी पाटीलने आपल्या अदाकारीने रसिकांना जिंकले!


अलिबाग (सचिन शं. पाटील)


राधेय कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ चिर्ले आयोजित उरण-पनवेल प्रीमिअर स्पर्धेच्या फायनलला रविवारी (ता. २३) आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात महेंद्रशेठ घरत आणि गौतमी पाटील यांचे स्वागत केले. यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, "मी कलेवर आणि कलाकारांवर प्रेम करणारा माणूस आहे. कलाकारांना प्रोत्साहन देणे, हे माझे कर्तव्य मानतो. त्यामुळे चिर्ले येथील तरुण 'सुखकर्ता' बंगल्यावर आले होते. त्यांनी माझ्याकडे आमच्या प्रीमियर लिगला आम्ही गौतमी पाटील यांना आणत आहोत. येथील रसिकांना आणि क्रीडाप्रेमींना सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या नृत्याचा आनंद द्यायचा आहे. त्यामुळे तुम्ही प्रायोजकत्व स्वीकारावे, अशी विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन मी उरण-पनवेल प्रीमियर लिगचे प्रायोजकत्व स्वीकारले. कलाकारांना प्रोत्साहन आणि स्थानिक तरुणांच्या उदात्त भावना लक्षात घेतल्या. क्रिकेटचा मी नुसता चाहता नाही, स्वतः भरपूर खेळतो."

"महेंद्रशेठ घरत यांनी दिलेला शब्द पाळला. असा शब्दाचा पक्का राजकीय पटलावर एकच नेता आहे तो म्हणजे महेंद्रशेठ घरत," अशा भावना आयोजकांनी यावेळी व्यक्त केल्या. उरण-पनवेल प्रीमियर लिगचे आयोजक दीपक पाटील, संतोष पाटील आणि त्यांच्या टीमने शाल, सन्मानचिन्ह देऊन महेंद्रशेठ घरत यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी हजारो क्रिकेटप्रेमींनी महेंद्रशेठ जिंदाबाद, अशा घोषणांनी क्रिकेट मैदान दणाणून सोडले. यावेळी परिसरातील इतरही अनेक मान्यवर उपस्थित होते.

Previous Post Next Post