Home

अलिबागकर एक हात मदतीचा ग्रुपकडून वृद्धाश्रमात होळी साजरी; सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश


 अलिबागकर एक हात मदतीचा ग्रुपकडून वृद्धाश्रमात होळी साजरी; सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश 


अलिबाग (ओमकार नागावकर) 

समाजातील वंचित आणि एकाकी ज्येष्ठ नागरिकांनाही सणाचा आनंद मिळावा या उदात्त हेतूने अलिबागकर एक हात मदतीचा या सामाजिक ग्रुपच्या सदस्यांनी परहूरपाडा येथील वृद्धाश्रमाला भेट देत ज्येष्ठ नागरिकांसोबत होळी साजरी केली.

ग्रुपच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सदस्यांनी वृद्धाश्रमात जाऊन ज्येष्ठांसोबत संवाद साधला, रंगांची उधळण करत सणाचा आनंद वाटून घेतला आणि त्यांना आपुलकीची साथ देत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमामुळे वृद्धाश्रमातील वातावरण काही काळासाठी उत्साहाने आणि आनंदाने भरून गेले. 

या उपक्रमात ग्रुपचे अनेक सदस्य तसेच लहान मुलांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. समाजसेवेचे संस्कार बालपणापासूनच मुलांमध्ये रुजावेत या उद्देशाने अनेक सदस्य आपल्या मुलांना सोबत घेऊन आले होते. त्यामुळे या उपक्रमातून सामाजिक जाणीव आणि संवेदनशीलतेचा सुंदर संदेश देण्यात आला. 

या कार्यक्रमात मिलिंद समेळ, सुरेश साळुंखे, मनोज माळी, विश्वनाथ कोळी, साक्षी राऊत, श्री राऊत, संतोष म्हात्रे, अनुश्री म्हात्रे, महंत म्हात्रे, अतुल गुरव, तनिष्का गुरव, यात्विक गुरव, मिलिंद भालवणकर, गणेश भगत, देवकी दळवी, शैलेश दळवी, शिवाय दळवी, विहान भगत, नव्या भगत, प्रितेश पाटील, रुपेश म्हात्रे, प्रसाद चेवले, नितीन पाटील व अमरेश ठाकूर यांनी सहभाग नोंदवला. उपस्थित सर्व सदस्यांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले असून, भविष्यातील सामाजिक उपक्रमांमध्येही असा उत्स्फूर्त सहभाग राहावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Previous Post Next Post