Home

धन्य ते गुरूशिष्याचे नाते... लेखिका राधिका (माजगावकर )पंडित


                         

        धन्य ते गुरु शिष्याचे नाते.                       .

 जोगेश्वरी ते भावे स्कूल माझा आणि ति. नानांचा प्रवास खूप आनंदात चालला होता. माझे वडील भावेस्कूलला खूप मानत होते तन, मन, श्रद्धेनी त्यांनी विद्यादान केलं.                 माझे परमपूज्य वडिल,ति.दत्तोपंत  स.माजगांवकर हे सुप्रसिद्ध इतिहासकार शिवशाहीर, पद्मभूषण,    श्रीबाबसाहेब पुरंदरे ह्यांचे मुलांच्या भावेस्कूलमधले आदरणीय शिक्षक होते. पुण्यभूषण मासिकांत त्यांनी आवर्जून आपल्या सरांचा म्हणजे माझ्या वाडिलांचा मानाने उल्लेख केला आहे.                     बाबासाहेबांसारखा थोर माणूस आपल्या गुरुंना इतक्या वर्षांनंतरही मानवंदना देतो. केवढी  ही गुरुनिष्ठा आणि गुरुंवरील श्रद्धा!. सारं जग,श्री.बाबासाहेबांपूढे मान देऊन झुकतं. जगाची मानवंदना घेणारे हे शिवशाहिर.           श्री.माजगावकर  सरांचं  नुसतं नांव ऐकल तरी नम्रतेने त्यांना मानवंदना देतात. प्रत्येक मुलाखतीत आवर्जून सरांचा उल्लेख करतात. ते म्हणाले, "शिवरायांनी इतिहास घडवला तर आदरणीय श्री.माजगावकर सरांनी माझ्या मनांत  इतिहास जागवला"  केवढी ही शालीनता. आज माझे  वडील असते तर ते कृतकृत्य झाले असते. बाबासाहेबांनी पण, कुठल्याही

कार्यक्रमाला निघतांना पहिला मानाचा मुजरा

सर्वप्रथमआपल्या

सरांनाच केला असता.

शिवाजी राजांची अढळ श्रद्धा आपल्या

गुरुंवर श्रीसमर्थ रामदास स्वामीं वर होती.

तितकीच

श्रध्दा हया शिष्याची आपल्या गुरुंवर 

होती. जगापुढे शिवरायांचा आदर्श

मांडणारे इतिहासकार शिवशाहिर  बाबासाहेब पुरंदरे 

आपले श्रेय माननीय सरांनाच देतात. त्यांच्या नम्रतेची, श्रध्देची, गुरुभक्तीची प्रचिती आम्हाला एका प्रसंगानें प्रत्ययास आली. त्याच असं झाल.   शरद जोशी हे

 बाबासाहेबांचे शालेय मित्र होते. आणि त्यांच्या सौभाग्यवती म्हणजे, माझ्या बहिणीची कमलची, जवळची बालमैत्रिण.         शरद जोशींची

 एकसष्टी होती. आणि त्या कार्यक्रमाला     बाबासाहेब आले होते. बाबासाहेबांनी आपल्या कर्तबगारीनें,

सुस्वभावाने लोकांची मने जिंकून किर्तीचं शिखर गांठलं होत. आणि जनसागरांत मानाच पान पटकावल होत. त्यांना इतका मान होता की, त्यांचा प्रवेश झाला. आणि श्री. बाबासाहेब आले, असं नुसतं म्हणाल्यावरही लोकं जागेवरून उठून उभे राहयचे. तर सुप्रसिद्ध इतिहासकार, असे हे माननीय, श्री शरद जोशींच्या ६१ ला आले होते. त्यांच्या उत्साही,चपळ, कणखर व्यक्तिमत्वानें, आगमनाने त्या कार्यक्रमाला वेगळीच रंगत चढली.  माझी बहिण पण या कार्यक्रमाला हजर होती. सौ.जोशींनी माझ्या बहिणीशी ओळख करून देतांना बाबासाहेबांना सांगितले" बरं का  बाबासाहेब, ही  कमल,माझी बाल मैत्रिण. म्हणजे तुमच्या श्री.माजगांवकर सरांची मुलगी आहे".  हे ऐकताक्षणी, बाबासाहेबांनी काय कराव! ते ताड्कन उठले. आणि  कमलच्या  समोर आले. तिच्या समोर उभं राहून त्यांनी तिला मुजरा केला. माझी बहिण गोधळून गेली. कार्यक्रमाला आलेले सगळेच पाहूणे उठून उभे राह्यले आश्चर्य चकित होऊन बघायलाच लागले.अवघडलेल्या माझ्या बहिणीकडे बघून ते म्हणाले, "तुमचे वडिल माजगांवकर,

सर म्हणजे माझे सन्मानीय, आदरणीय गुरु आहेत. दुदैवाने ते आता नाहीत. हा मानाचा मुजरा, सरांची मुलगी म्हणून तुम्हाला करतोय.

 पण हा त्रिवार मुजरा माझ्या  सरांसाठी आहे. आणि तो त्यांना पोहोचलाही असेल."

केवढी ही नम्रता. आणि केवढी ही गुरुभक्ती! ती बघून कमलचे डोळे वडिलांच्या आठवणीने भरून आले.                   तर मंडळी असे होते हे गुरुशिष्याचे अलौकिक  अढळ नाते. बाबासाहेबांना बघण्याची, भेटण्याची माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती. पण योग येत नव्हता. म्हणून वाईट वाटत होते. आणि अचानक=अचानक

तो योग जुळून आला. मला   कम्मालीचा आनंद झाला.खूप दिवसापासूनची माझी मनांतली इच्छा पूर्ण झाली.  फोनवर ,  "बाबासाहेब, मी माजगावकर  सरांची मुलगीबोलतीय"अशी ओळख सांगून. भेटण्याची  इच्छा दर्शवली. माजगांवकर सरांच  नांव  ऐकून,         श्री बाबासाहेबांनाही खूपच आनंद झाला.

माझे जावई श्री. सुजित सु·जोशी खूप उत्साही आहेत. त्यांच्या ओळखीने हा सुवर्ण योग जुळून आला- ते आम्हांला बाबासाहेबांकडे घेऊन गेले. त्यांच्या बरोबर आमचा फोटो काढला. अतिशय दुर्मिळ आजकाल बघायलाही मिळणार नाही  .अशी मोडी लिपीतली, बाबासाहेबांची  वळणदार, सुरेख सही आम्हांला मिळाली. मी अगदी भाराऊन गेले होते. सारखा मनात विचार येत होता.  बाबासाहेबांची ऐतिहासिक वास्तु, त्यांची कर्तबगारी, त्यांचा लोकसंग्रह आणि समाजांत मिळवलेला

मोठ्ठा  मानसन्मान  बघायला या पट्टशिष्याचें गुरु ति.माजगांवकर सर माझे वडील आज हवे होते,..             हवे होते..            हया गुरु शिष्याच्या नात्याचा  शोध  माझा भाचा  सतीश  मुळे लागला होता. आज तोही हयात नाही. दाटल्या कंठाने  हात जोडून मी मनांत म्हणालें  "कालाय तस्मै नमः"

निघतांना,  बाबासाहेब मला म्हणालें " सरांचा शालेय जीवनातला फोटो असेल ना तुमच्या कडे? मला तो हवा आहे. मी माझे आत्मवृत्त लिहीतोय.त्याच्या

मुखपृष्टावर मला,    मा.सरांचाचं फोटो लावायचा आहे. सुदैवाने कोट टोपी धोतर असा    ति.नानांचा फोटो: भाच्याकडून          चि. हेमंतकडून मला मिळाला.तो बघितल्यावर बाबासाहेब प्रसन्न हंसले.  सतीश   माझा भाचा  त्याच्या मुळे हया गुरु शिष्य  नात्यांचा शोध लागला. आणि चि.सुजित जोशींमुळे मला श्री.बाबासाहेब पुरंदरे प्रत्यक्ष भेटले. माझ्याशी प्रेमानें बोलले. तो आनंद, तो क्षण माझ्या आठवणीतल्या शिदोरीतला, अत्यंत मोलाचा, अत्यंत मोलाचा असा क्षण आहे.                     तर मित्र-मैत्रिणींनो असे होते हे गुरुशिष्याचे महान, आदर्श आणि  वाखाणण्यासारखं  नातं, धन्य ते माझे वडील आणि

 धन्य ती गुरुभक्ती . श्री.बाबासाहेब तुम्हांला माझा मानाचा, त्रिवार मुजरा. जय शिवाजी,  जय भवानी                

                लेखिका - राधिका  (माजगांवकर) पंडित. पुणे

Previous Post Next Post