Home

होळीचे रंग... कवयित्री भाग्यश्री बारवाल


 होळीचे रंग 


होळीचे रंग 

 खेळूया संग !

होऊया दंग 

नाचू या संग...


आवडीचे गाल 

करूया लाल !

 लाल पिवळा 

 हिरवा निळा ...


कान्हाचा रंग 

राधा च्या संग !

 हास्य फुलवू

 गुलाल उधळू...


रंगाचा मान 

 होळीची शान !

 रंगाची आन 

 श्रीकृष्णाची शान ...


राधेची प्रित 

प्रेमाची रीत!

 राधा बावरी 

कृष्णाला आवडी...


सौ.भाग्यश्री संदीप बारवाल.

 छत्रपती संभाजी नगर

Previous Post Next Post