Home

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळा दुधनी येथे शिवजयंती जल्लोषात साजरी


 जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळा दुधनी येथे शिवजयंती जल्लोषात साजरी 

अक्कलकोट (प्रतिनिधी )

अक्कलकोट तालुक्यातील दुधनी जि.प.प्राथ.मराठी केंद्र शाळा दुधनी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली.प्रथम प्रतिमेस शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री हणमंत कलशेट्टी व इतर मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केले.व्यासपिठावर  अध्यक्ष म्हणून जन्मभूमी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवकुमार झळकी होते, प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री पोमू राठोड यांनी मांडले. अनेक विद्यार्थी शिवाजी महाराज विषयी भाषणे केली.विविध गाण्यावर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.यावेळी अनेक पालकांनी शाळेसाठी भौतिक सुविधा किंवा इतर  शैक्षणिक साहित्य देण्याचे जाहीर केले.मुंलाचे कौशल्य पाहून अनेक पालक अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या.जन्मभूमी फाउंडेशनचे अध्यक्ष बोलतांना म्हणाले या शाळेचे कौतुक करावे तेवढे थोडेच अशी कौतुकाची थाप दिली. यावेळी अध्यक्ष श्री हणमंत कलशेट्टी, उपाध्यक्ष श्री राजेंद्र इंगळे, शिक्षणप्रेमी श्री सैदप्पा झळकी, श्री दाऊद नदाफ,उमाकांत आळंद मिहिदमिया जिडगे, कन्नड मुली शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विलास पोतदार श्री राम पुजारी,श्रीशैल चिंचोळी, श्री जगदीश चिंचोळी श्री भगवान बनसोडे, शिवा हौदे,सौ.सुजाता कांबळे सौ.सुसलाबाई बिल्लाड,सौ.मल्लम्मा मोडलकर प्रियंका हौदे,यावेळी मुख्याध्यापक श्री पोमू राठोड, श्री श्रीशैल मलगण, श्री रविकुमार कोरचगाव, संजीवकुमार बेण्णेसूर, श्री सुहास पवार, अंजली गुंजोटे तसेच शेकडो पालक उपस्थित होते.

Previous Post Next Post