Home

शिवजयंती निमित्त महाआरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न


 शिवजयंती निमित्त महाआरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

अलिबाग(प्रतिनिधी )

माथाडी कामगार शिवजन्मोत्सव संस्था, आर.सी.एफ. थळ यांच्या वतीने शिवजयंती सोहळा 2026 निमित्त उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था व माणुसकी प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने महाआरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न झाले.

दि. 19 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित या शिबिरात अस्थिरोग तज्ञ डॉ. राहुल शर्मा यांनी विशेष उपस्थिती दर्शवून कामगार व नागरिकांची तपासणी केली. शिबिरामध्ये लिव्हर टेस्ट, कोलेस्ट्रॉल टेस्ट, शुगर टेस्ट, GGT टेस्ट तसेच रक्त तपासणी करण्यात आली. एकूण 105 नागरिकांची ब्लड टेस्ट करण्यात आली तर 55 अस्थिरोग रुग्णांची तपासणी करण्यात आली.

या शिबिरासाठी लॅब सेवा सचिन भोसले यांनी दिली.माथाडी कामगार शिवजन्मोत्सव संस्थेचे अध्यक्ष विशाल आढाव, सचिव अमोल सोंडकर, खजिनदार विपुल जगदाळे तसेच कार्यकारी सदस्य संतोष कणसे, सचिन चव्हाण, अतुल गवळी, विशाल कदम, आनंद मोरे, प्रल्हाद रांजने, राहुल वरेकर, गणेश गोरे, राजेश वरेकर व रवी फाळके यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमास उपस्थित मान्यवर म्हणून नामदेव कटरे, डॉ. कुलकर्णी सर, आनंदा लोखंडे, बाबुराव पवार, मनोहर शीळीमकर, पद्माकर शीळीमकर व संजय वाघ उपस्थित होते.उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था व माणुसकी प्रतिष्ठान यांच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. शिवजयंती निमित्त आयोजित हा सामाजिक उपक्रम कामगार व नागरिकांमध्ये आरोग्य जनजागृतीसाठी महत्त्वपूर्ण ठरला असून उपस्थितांनी उपक्रमाचे कौतुक केले.

Previous Post Next Post