संगणक साक्षरता..
( अष्टाक्षरी रचना)
उत्क्रांतीच्या टप्प्यांमधे
विकासाला गती येई
संगणक युगे जगी
क्रांती घडुनिया येई
डेस्कटॉप लॅपटॉप
मोबाईल रूप घेई
पूर्वी जागा व्यापणारा
आता मुठीमध्ये येई
ठरे प्रगतीचा मार्ग
त्याने काम सोप्पे होई
नाना क्षेत्री हातभार
जळीस्थळी कामी येई
अभियांत्रिकीचे क्षेत्र
त्याला अपवाद नाही
किती उपयोग होतो
त्याची गणनाच नाही
आंतरजालाच्या स्पर्शे
माहितीचा स्रोत होई
त्याने आबालवृद्धांच्या
जग कवेमध्ये येई
शोध अभियांत्रिकीचा
त्यास खरं तोड नाही
कणा तो तंत्रज्ञानाचा
जगी बनुनिया राही
त्याच्या वापराने इथे
काम जलदीने होई
किती महती तयाची
साऱ्या जगी कामी येई
संगणक साक्षरता
चावी विकासाची होई
कास धरता तयाची
सारे काही शक्य होई
********************************
आंतरराष्ट्रीय संगणक साक्षरता दिनाच्या (२ डिसेंबर) निमित्ताने ...
श्री. प्रविण शांताराम म्हात्रे.
