मुबईवर हल्ला होण्याची शक्यता; हायअलर्ट जारी; मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द?
मुंबई(वार्ताहर)
भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्याने देशातील महत्त्वाच्या ठिकाणांवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. जम्मू, राजस्थान, पंजाब या भागातील काही भागात पाकिस्तानने हल्ले केले आहेत. या ठिकाणी ब्लॅकआउट देखील करण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून प्रत्त्युत्तर देण्यात आले आहे. भारताने लाहोर, कराची आणि इस्लामाबाद येथे ड्रोन हल्ले केले आहेत. याच दरम्यान मुंबईवरही हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. धार्मिक आणि पर्यटन स्थळांवर हायअलर्ट आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा सक्रीय झाल्या आहेत.