शंभर कवींची मांदियाळी… श्रीराम प्रतिष्ठानच्या कवी संमेलनातून रंगणार शब्दांचा महोत्सव
सेलू (प्रतिनिधी)
साहित्य, कला आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या श्रीराम प्रतिष्ठान यांच्या वतीने दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता भव्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे कवी संमेलन श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या संकल्पनेतून साकारत असून, या संमेलनात राज्यभरातून शंभरहून अधिक कवी सहभागी होऊन आपल्या आशयघन, सामाजिक जाणीव जागवणाऱ्या व रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या कविता सादर करणार आहेत.
आजच्या धावपळीच्या युगात साहित्यिक अभिव्यक्तीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या कवी संमेलनात नवोदित व ज्येष्ठ कवींचा सुरेख संगम अनुभवायला मिळणार आहे. प्रेम, सामाजिक वास्तव, ग्रामीण जीवन, स्त्री-सशक्तीकरण, देशभक्ती, सांस्कृतिक मूल्ये आदी विविध विषयांवरील कविता या संमेलनाचे वैशिष्ट्य ठरणार आहेत. सहभागी कवींची नावे लवकरच जाहीर करण्यात येणार असून, साहित्यप्रेमी रसिकांमध्ये या संमेलनाबाबत उत्सुकता वाढत आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गठीत करण्यात आलेल्या नियोजन समितीत स्वागताध्यक्ष म्हणून श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, आयोजक म्हणून श्री. भरतकुमार लाड, तर सदस्य म्हणून सौ. निशा विसपुते, सौ. सिंधुताई दहिफळे, सौ. जयश्री सोनेकर, श्री. सर्जेराव लहाणे, श्री. शरद ठाकर व श्री. योगेश ढवारे यांची प्रमुख भूमिका आहे.
या भव्य कवी संमेलनास मा. ना. मेघनादीदी साकोरे -बोर्डीकर, राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, तथा पालकमंत्री परभणी. मा. श्री. सुरज गुंजाळ, आयपीएस, अप्पर पोलीस अधीक्षक, परभणी, मा. श्रीमती रश्मी खांडेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, परभणी, मा. नगराध्यक्ष, नगरपरिषद सेलू, मा. श्री. दीपक बोरसे, पोलीस निरीक्षक, सेलू, यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
सहभागी कवी -सौ.मुक्ता कोरपे पुणे, श्री.सदानंद सपकाळे नांदेड, राजकुमार नायक हिंगोली, सौ. अनुराधा वायकोस, परभणी, सौ.ज्योती इंगोले परभणी, गजानन उफाडे नाशिक, सौ अंजली कानिंदे मुनेश्वर नांदेड, कैलास कावरखे सेनगाव, श्री. शंकर कदम , परभणी, श्रीमती व्यंकटबाई चेनलवाड, श्री. गौतम खिल्लारे,परभणी, संदीप पाटील गोरेगावकर, श्री.रामकिशन डोळस, श्री. गणेश मोताळे, श्रीमती. सविता वडगावकर, श्री. राम जोशी, परभणी, आबा पांचाळ वसमत, पांडुरंग मुंजाळ, वसमत, सौ. पूजा साबू, बुलढाणा, श्री. गजानन रावूत, श्री. योगेश ढवारे, सेलू, श्री. बालाजी भागानागरे, नांदेड, श्री प्रेमेंद्र भावसार ,परभणी, सुनंदा भगत नांदेड, साईनाथ रहाटकर, नांदेड, रविराज सोनार (नाशिक), डॉ.निखिल नायक सवना, उत्तम राव मनवर, दिग्रस, विष्णू जाधव, परभणी, डाॅ.दत्ता शेषराव ठुबे सं.नगर, गणपत माखणे हिंगोली, दिलिप कापसे, धारूर, अनिल वानखेडे, सं नगर, बालिका बरगळ नांदेड, मगनलाल बागमार,नासिक, किशोर देशमुख,परभणी, आशा भावसार, जालना, रुचिरा बेटकर नांदेड, अनिल वानखेडे, सं.नगर, जान्हवी जाधव,लातूर, शिवाजी कऱ्हाळे हिंगोली, पाराजी टेकाळे, परभणी, मंगेश कवटीकवार नांदेड, गजेंद्र तढेगावकर जालना, प्रल्हाद वि. घोरबांड नांदेड, गोविंद ना आंबोरे परभणी, संजय विंचु परभणी, आनंद येडपलवार, पुनम बावठणकर किल्ले धारूर, रूपाली वागरे/वैद्य, ज्योती परांजपे, अंजली हिंगोले, दत्ता वालेकर,अंबाजोगाई, मिलिंद घोरपडे, जालना, गुट्ठे अशोकराव हिंगोली, मदन अंभोरे वसमत, चांद पिरनसाब वसमत, मोरे बबन हिंगोली, लक्ष्मण सुत वसमत, श्री डॉ. दत्ता ठुबे संभाजीनगर, शंकर माने जिंतूर, मयूर जोशी जिंतूर, कृष्णा वानखेडे पुणे, सुरेंद्र भालेराव परभणी, शशी बेंडके, खंडू सोनवणे,छ.संभाजीनगर, विनय पिंपरकर अहिल्यानगर, सौ.विद्या वाढवे परभणी, समाधान लोणकर ,हिंगोली, आर.एन.कांबळी,पाथरी, सचिन मुळे परभणी, मिलिंद बगाटे परभणी, राजू खंडाळे संभाजीनगर, अनुराज मोहन रासकटला , परभणी, बालाजी शेळके हिंगोली, दर्शन कुमार नेरकर, धुळे, अशोक पाटील नाशिक, रमेश कुलकर्णी, परळी वैजनाथ, जयश्री सोन्नेकर, सेलू, उज्ज्वला वडनेरे, नवापूर, डॉ. ज्ञानेश्वर शिवाजी सूर्यवंशी, गंगाधर हरणे वसमत, गोविंद आंभोरे, परभणी.
श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने साहित्य क्षेत्रातील उपक्रम सातत्याने राबवले जात असून, या कवी संमेलनाच्या माध्यमातून सेलू शहरात साहित्यिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे सेलू शहरातील नागरिकांनी तसेच साहित्य, कला आणि संस्कृती क्षेत्रात रुची असलेल्या सर्व साहित्यप्रेमींनी या कवी संमेलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. संजय रोडगे यांच्या वतीने करण्यात आले आहे.