Home

कल्याणमध्ये 'हेरिटेज रन' उत्साहात संपन्न


 कल्याणमध्ये 'हेरिटेज रन' उत्साहात संपन्न

आयुक्त अभिनव गोयल यांचे हेरिटेज वॉक प्रकल्पास प्रोत्साहन.


कल्याण(वार्ताहर)

 ' चला धाऊ या ' आपल्या ऐतिहासिक वारसाचे रक्षण करण्यासाठी' (To Protect Our Heritage) या संदेशासह रोटरी क्लब ऑफ कल्याणने आयोजित केलेली डी.बी. रोटरी रन २०२५ काल, रविवार, २ नोव्हेंबर २०२५ रोजी जिओ मार्ट, वसंत व्हॅली, खडकपाडा येथे शेकडो नागरिकांच्या सहभागाने प्रचंड उत्साहात यशस्वीरित्या पार पडली. . या स्पर्धेतील सर्व धावपटूंमध्ये ऐतिहासिक वारसा जपण्याची नवी ऊर्जा संचारली होती आणि ही स्पर्धा म्हणजे एका सामाजिक उद्देशाला दिलेला क्रीडाप्रेमी प्रतिसाद ठरली. या उपक्रमामागील मुख्य उद्देश कल्याणचा समृद्ध ऐतिहासिक वारसा, जसे की मध्ययुगीन किल्ले, मंदिरे आणि प्राचीन वास्तूंचे महत्त्व, नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये रुजवून त्याबद्दल जनजागृती करणे हा होता. जिल्हापप्रांतपाल हर्ष मोकल (जिल्हा ३१४२) यांच्या हस्ते या रोटरी रनचे उद्घाटन झाले. या स्पर्धेत १० किमी (सकाळी ०६.०० वा.), ५ किमी (सकाळी ०६.२० मि.) आणि ३ किमी (सकाळी ०७.०० वा.) अशा तीन श्रेणींमध्ये धावपटूंनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाला कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी विशेष उपस्थिती लावली. यावेळी बोलताना आयुक्तांनी, शहरातील ऐतिहासिक वास्तूंजवळ माहिती फलक आणि डिजिटल बोर्ड लावून 'हेरिटेज वॉक' किंवा 'हेरिटेज ट्रेल' सुरू करण्याची क्लबची संकल्पना अतिशय महत्त्वाची असल्याचे सांगितले. तसेच, या उपक्रमासाठी केडीएमसीकडून फूटपाथ आणि पथदिव्यांच्या कामात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. उपक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक श्री. मच्छिंद्र जाधव (डीबी ग्रुप) यांनी मोलाचे सहकार्य केले. या प्रसंगी माजी जिल्हा प्रांतपाल रो. मिलिंद कुलकर्णी, रोटरी क्लब अध्यक्षा रो. रुईता सपकाळे, सचिव रो. जय राठोड, रो. अरुण सपकाळे, रो. आत्माराम घाणेकर, रो. राम मराठे, रो. निखिल चौधरी, रो. माधवी कुलकर्णी, रो. भक्ती सोनावणे, रो. पराग कापसे, रो. तेजल पटेल, रो. वैशाली परदेशी, रो. दिलीप कर्डेकर, रो. रोहन गोळे, रो. यश पटेल, रो. अंजली जोशी, रो. जागृती हिंदुराव, रो. विनोद सिंग, रो. रेवती गोळे, रो. चंद्रशेखर कुलकर्णी हे उपस्थित होते.

Previous Post Next Post