Home

सौ. सोनाली जगताप यांच्या "ॐ नमः शिवाय" काव्यसंग्रहाला "साहित्यसंपदा पुस्तक रत्न" पुरस्कार


 सौ. सोनाली जगताप यांच्या "ॐ नमः शिवाय" काव्यसंग्रहाला "साहित्यसंपदा पुस्तक रत्न"  पुरस्कार

मुंबई (वार्ताहर)

मराठी संवर्धन, प्रचार प्रसार या हेतूने स्थापन झालेल्या साहित्यसंपदा संस्थेचा सातवा  वर्धापनदिन गणेश मंदिर डोंबिवली येथे रविवार दिनांक ९ नोव्हेंबर रोजी पार पडणार असून‘साहित्यसंपदा पुस्तक रत्न’ पुरस्कारांची यादी स्वागताध्यक्षा सलोनी बोरकर यांनी जाहीर केली त्यात सौ. सोनाली सुहास जगताप लिखित  'ॐ नमः शिवाय' या पुस्तकांला परीक्षणाद्वारे पुरस्कार प्राप्त झाला आहे. यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

या कार्यक्रमाचे मान्यवर बालसहित्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त श्री. एकनाथ आव्हाड अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रसिद्ध गझलकार आणि गीत रामायण हिंदी मध्ये भाषांतरित  करणारे दत्तप्रसाद जोग, पै फ्रेंड्स लायब्ररीचे संचालक पुंडलिक पै, अनेक सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविणारे आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था अध्यक्ष हेमंत नेहते, असे साहित्य, समाज, शिक्षण, कला क्षेत्रातील विविध मान्यवर निमंत्रित म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार असल्याचे साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे यांनी सांगितले.


Previous Post Next Post