Home

महाराष्ट्र पोलीस दलातील साहित्यिक उत्तम तरकसे यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा


महाराष्ट्र पोलीस दलातील साहित्यिक उत्तम तरकसे यांचा अभिष्टचिंतन सोहळा  उत्साहात साजरा..!


 नवी मुंबई(वार्ताहर)

नवी मुंबई खारघर पोलीस ठाणे येथे तथागत भगवान गौतम बुद्ध, छ शिवाजी महाराज, छ संभाजी महाराज, आद्य समाज सुधारक ज्योतिबा फुले,छ शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध साहित्यिक कवी- लेखक आणि अभ्यासू विचारवंत महाराष्ट्र पोलीस दलातील स्थित कार्यरत नवी मुंबई गुन्हे शाखेत असलेले पोलीस अधिकारी श्री उत्तमराव दासू तरकसे यांचा ५५ वाढदिवस नवी मुंबई येथील खारघर पोलीस ठाणे येथे *विश्व मांगल्ये सभा खारघर* यांच्या माध्यमातून सौ मेघनाताई सौ प्राचीताई सौ मैथिली आणि सौ सुचिताताई यांनी समाजभूषण श्री उत्तमराव दासु तरकसे यांचे खारघर पोलीस स्टेशनमध्ये रांगोळी काढून त्यांचे औक्षण करत त्यांचा ५५ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या दिमाखात साजरा  करण्यात आला 
     सदर कार्यक्रमादरम्यान खारघर पोलीस ठाणे येथील पीएसआय सोनवणे पीएसआय चव्हाण पोलीस आमलदार कांबळे महिला पोलिसा आमलदार पार्टे मॅडम तसेच सर्व पोलीस ठाणे तील अधिकारी व अंमलदार तसेच विश्व मांगल्ये संस्थेचे इतर पदाधिकारी व सदस्य तसेच खारघर नवी मुंबई मधील आसपासच्या परिसरातील सुज्ञ नागरिक व समाजभूषण उत्तम तरकसे यांच्या चाहता वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन करत पुढील उल्लेखनीय प्रगती करिता सर्वांनी त्यांच्यावर मंगलमय शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला 
   सदर कार्यक्रमाचे आयोजन विश्वमंगल्ये संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य व नवी मुंबई पोलीस दलातील सर्व अधिकारी व अंमलदार तसेच नवी मुंबई परिसरातील उपस्थित सुज्ञ नागरिक व चाहत्या वर्गांचे आभार मानत त्यांचा नवीन *"गरीबाची भाकर करपली"* हा कथासंग्रह लवकरच प्रकाशित होत असल्याची वाचकांना गोड बातमी देत सर्व कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे व विश्व मांगल्ये संस्थेने सदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे व सर्व अधिकारी अंमलदारांचे मनःपूर्वक आभार मानत कार्यक्रमाची सांगता करण्यात आले
Previous Post Next Post