Home

वंदे मातरम्... कवयित्री मानसी जोशी


 वंदेमातरम्


वंदे मातरम् हे गीत आमचे

राष्ट्रभक्ती अन एकपणाचे 

वर्धापनदिन आज करुया

कौतुक बंकिमचंद्र कविचे


शके एकोणिसाव्या शतकी

स्वातंत्र्याच्या बलिवेदीवर

नमूद आनंदमठ ग्रंथामध्ये 

वंदेमातरम स्थान पानावर


राष्ट्रगीत हे झाले सुंदर 

वर्ष दिडशे आज जाहली

स्मरणोत्सव दिल्लीत साजरा

भारतभूमी आनंदीत झाली 


चळवळ होती स्वातंत्र्याची

मनामनाशी बीज रुजले

वंदेमातरम् गीता मधूनी 

क्रांतीसाठी स्फुरण चढले


देशभक्तीचा नारा घुमला

रक्त उसळले क्रांतीचे

शतकोत्तर ही आठवण झाली 

स्फुरण चढले पुन्हा भक्तीचे



प्रा‌.मानसी जोशी

Previous Post Next Post