कोणीतरी हवं असत......
कोणीतरी हवं असत.......
कोणीतरी हवं असत... सोबत आयुष्याची वाट चालायला...
जो हात देईल कधीही साथ न सोडायला....
कोणीतरी हवं असत.......
कोणीतरी हवं असत....... जीवाला जीव देणार...
स्वतःच्या हृदयात स्थान देणार...
कोणीतरी हवं असत....... दिलखुलास हसणार.....
काहीही न बोलता बरच काही समजून घेणार ...
कोणीतरी हवं असत....... मनमोकळ बोलायला...
अन् डोळे भरून आले की मनसोक्त रडायला...
सुवर्णा गावंडे.
बोरिवली, मुंबई.
