हे नारी'
भले असेल नसेल,
उद्या सोबत मी बाळा,
जन्मोजन्मी उध्दारी गं,
अशी तु प्रत्येक कुळा,
शिकवण ही आईची,
लेकी जिवना शिदोरी,
पट तिच्या आयुष्याचा,
तिची कहानी अधुरी,
घडविती कुटुंबाचा,
पाया संस्काराचा,
आहे तुच गं आधार,
एका सुखी संसाराचा,
जग स्वप्नांचे जागवी,
पंख जगी भरारीचे,
उदरातुनी अंतरंगी,
आहे सार जीवनाचे,
नारी कल्याणा जगाच्या,
तुझे काळीज तुटते,
कधी होई विरांगणा,
अख्खे आयुष्य वेचते.
मंगेश शिवलाल बरई.
हिरावाडी, पंचवटी, नाशिक-४२२००३.
