Home

मुरुड जंजिरा येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा लोकार्पण सोहळा संपन


 मुरुड जंजिरा येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा लोकार्पण सोहळा संपन्न


अलिबाग (वार्ताहर )


     मुरुड जंजिरा नगर परिषद व मुरुड तालुका बौद्ध समाज सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा लोकार्पण सोहळा मा. आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

          या स्मारकाच्या माध्यमातून सामाजिक न्याय, समता आणि बंधुतेच्या तत्त्वांची जोपासना तसेच जनजागृतीचा प्रसार साधला जाणार आहे.

          कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला.

        त्यावेळी त्यांच्या सोबत मा. जगदीशभाई गायकवाड (मा. उपमहापौर पनवेल महानगरपालिका तथा संस्थापकीय अध्यक्ष ब्लैंक पैंथर),मा. सचिन बच्छाव, मा. सौ. स्नेहा किशोर पाटील, मा. सौ. मानसीताई महेंद्र दळवी,मा. सौ. कविताताई गायकवाड, मा. नितीनभाऊ मोरे, मा. सौ. कल्पना गायकवाड, मा. राजाभाई केणी,मा. भरत बेलोसे, मा. ऋषिकांत डोंगरीकर, मा. ऍड महेश मोहिते, मा. राहुल सोनावले, मा. विघ्नेश माळी, मा. मोहनीष गायकवाड, मा. निलेश घाटवल, मा. मनोज कमाने, मा. सुनील सप्रे, मा. ऍड बबन शिंदे, मा. भगवान शिंदे, मा. परशुराम कांबळे ई. मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Previous Post Next Post