Home

पिंपरी चिंचवडमध्ये १२ वर्षाचा मुलगा लिफ्टमध्ये अडकला; मदतीसाठी याचना करुन थकला; श्वास कोंडल्याने जीव सोडला


पिपरी चिंचवडमध्ये १२ वर्षाचा मुलगा लिफ्टमध्ये अडकला; मदतीसाठी याचना करुन थकला; श्वास कोंडल्याने जीव सोडला

पुणे(वार्ताहर)

पिंपरी-चिंचवड परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. शहरातील चौवीसवाडी येथील राम स्मृती सोसायटीत गुरुवारी संध्याकाळी भीषण घटना घडली. लिफ्टचा दरवाजा न उघडल्याने एका १२ वर्षीय मुलाचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून सोसायटीत शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राम स्मृती सोसायटीच्या इमारतीतील तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या दरम्यान लिफ्ट अचानक अडकली. त्यावेळी लिफ्टमध्ये १२ वर्षांचा मुलगा अडकून फसला. दरवाजा उघडत नसल्याने तो आत गुदमरू लागला. काही वेळाने परिसरातील रहिवाशांनी ही बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या अग्निशमन दलाला कळवले.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि लिफ्ट उघडून मुलाला बाहेर काढले. त्याला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून तो मृत झाल्याचे घोषित केले. रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्याने प्राण सोडल्याचे समजते. या दुर्घटनेनंतर चौवीसवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्यामुळे सोसायटीतील रहिवाशी संतप्त झाले असून लिफ्टच्या देखभालीत झालेल्या निष्काळजीपणाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

12 वर्षीय चिमुरडा लिफ्टमधून वरच्या मजल्यावर निघाला होता. चार मजली इमारतीची लिफ्ट जुन्या पद्धतीची, त्याचं दार लोखंडी पट्ट्याचं आहे. याचं लोखंडी पट्ट्यातून खेळता-खेळता पाय बाहेर आले. यामुळं लिफ्ट दोन मजल्यांच्या मधोमध अडकली. यात चिमुरड्याचे पाय फसल्यानं त्याने सुटका करुन घेण्यासाठी आरडाओरडा केला. त्याचा आवाज ऐकून उपस्थित पोहचले, मुलाच्या आई-वडिलांना बोलवण्यात आले. मुलाची यातून सुटका करण्यासाठी अतोनात प्रयत्न सुरु झाले. वेळ निघून चालला होता, काहीवेळाने अग्निशमन दलाला कळवण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान पोहचले, त्यांनी कटरच्या साह्याने मुलाची यातून सुटका केली. पण उशीर झाला होता, रुग्णालयात दाखल केला असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.


Previous Post Next Post