विजयादशमी
सण विजयादशमी
सोनियाचा दिस आला
सोने वाटता स्नेहाने
हर्ष काळजास झाला
दारी बांधून तोरण
करू शस्त्राचे पूजन
पसरले आसमंती
नव्या ऋतूचे सृजन
आपट्याच्या पानातून
वाहे सुगंधी लहर
प्रेम वाटण्यास येई
मग सांजेचा प्रहर
अंतरीच्या रावणाचे
सारे करूया दहन
अंतरात वासनांना
नका करू रे सहन
नक्षीदार रांगोळीने
चला अंगण सजवू
अर्थ दसऱ्याचा खरा
साऱ्या मनात रूजवू
सण दसरा सुखाचा
आणी आनंदाचे क्षण
करू साजरा मिळून
कृषी संस्कृतीचा सण
वाटू स्नेह अंतरीचा
नको मनी वैरभाव
सण मांगल्याचा आला
गडे सुखावेल गाव
लीलाधर दवंडे
८४१२८७७२२०
कामठी (नागपूर)